Chilli Chicken - चिली चिकन

 लागणारा वेळ - ३० - ४५ मिनिटे
जणांसाठी - ६ - ७


साहित्य :
 • ५०० gm बोनलेस चिकन, पातळ तुकडे 
 • २ चमचे आले-लसूण पेस्ट 
 • ४ हिरव्या मिरच्या 
 • २ चमचे काश्मीरी लाल तिखट 
 • १/२ चमचा काळी मिरी पावडर 
 • २ चमचे सोया सॉस 
 • २ चमचे चिली सॉस 
 • १ चमचा टोमॅटो सॉस 
 • १/२ चमचा कॉर्न-फ्लोर 
 • २ कांदे, बारीक कापून 
 • १/२ भोपळी मिरची, बारीक कापून 
 • १ टोमॅटो प्युरी 
 • तेल 
 • मीठ, चवीनुसार 
 • १/२ काप चिकन स्टोक 
मॅरिनेशन 
 • २ चमचे कॉर्न-फ्लोर
 • १ चमचा काश्मीरी लाल तिखट 
 • १ चमचा आले-लसूण पेस्ट 
 • १ चमचा सोया सॉस 
 • १ चमचा टोमॅटो सॉस 
 • १ चमचा चिली सॉस 
 • मीठ 
कृती :
१. चिकन धुऊन त्याला तिखट, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस आणि मीठ लावून १ तासासाठी झाकून ठेवा. 
२. तोपर्यंत, कांदे आणि भोपळी मिरची कापून घ्या. 
३. झाकून ठेवलेल्या चिकन मध्ये कॉर्न-फ्लोर घालून नीट मिक्स करा. 
४. सॉस तयार करण्यासाठी, एक भांडं घेऊन त्यात सोया सॉस, चिली सॉस आणि लाल तिखट घालून नीट मिक्स करा. 
५. एक कढईत तेल गरम करा आणि त्यात चिकन तळून घ्या. तळलेले चिकन टिशू पेपर वर काढा. जास्तीचे तेल निघून जाईल. 
६. कढईतील जास्तीचे तेल काढून फक्त ४ चमचे तेल ठेवा. त्यात लसूण टाकून मिनिटभर परता. मग त्यात कांदा, भोपळी मिरची, हिरवी मिरची टाकून परतून घ्या. भाज्या थोड्या मऊ होईपर्यत परता. 
६.वरील तयार केलेले सॉस कढईत ओता. सॉस थोडा शिजला कि त्यात टोमॅटो प्युरी टाका आणि २ - ३ मिनिटे परता . 
७. आता तळलेले चिकन त्यात घाला आणि ३ - ४ मिनिटे परता. 
८. चिकन स्टोक घालून परत ४ - ५ मिनिटे परता. 
९. गरम चिली चिकन भाताबरोबर वाढा. 

टीप  - जर तुमच्या चिली चिकन ला लाल कलर आला नसेल तर थोडा खायचा लाल रंग टाका. Chilli Chicken - चिली चिकन Chilli Chicken - चिली चिकन Reviewed by Prajakta Patil on November 16, 2016 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.