Poha Chivda - पोहा चिवडा

 पोहा चिवडा
१ किलो चिवडा

साहित्य:
 • १ किलो पातळ पोहे 
 • १/४ किलो शेंगदाणे 
 • १०० gm चणा डाळ 
 • २ कप सुक्या खोबऱ्याचे पातळ काप 
 • १ कप लसुन पाकळ्या 
 • २५ gm मोहरी 
 • २ चमचे हळद 
 • १/२ कप साखर 
 • १०० gm हिरव्या मिरच्या 
 • कढीपत्ता 
 • मीठ, चवीनुसार 
 • २०० gm तेल 
कृती :
१. कढईत पोहे खरपूस भाजून घ्या.
२. मिरच्या, कढीपत्ता नीट धुऊन घ्या. मिरच्या उभ्या चिरून घ्या.
३. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप, आणि चण्याची डाळ वेगवेगळे तळून घ्या. एका ताटात काढून घ्या.
४. आता त्याच तेलात लसुण सोनेरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या. मग मिरच्या, मोहरी, कढीपत्ता आणि हळद घालून परतून २ मिनिटे शिजवा. थंड होऊ द्या.
५. वरील तळेलेले सर्व साहित्य पोह्यात टाका. नीट एकजीव करा.
६. त्यात साखर आणि मीठ घालून मिक्स करा.
७. तयार चिवडा १५ मिनिटे झाकून ठेवा.
८. चिवडा थंड होऊ द्या.
९. हवाबंद डब्यात ठेवा.
Poha Chivda - पोहा चिवडा Poha Chivda - पोहा चिवडा Reviewed by Prajakta Patil on November 05, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.