Rose Falooda - रोज फालुदा

मुंबईत मिळणारा फालुदा म्हणजे अहाहा ! असाच फालुदा घरी करता आला तर? मस्त ना.

फालुदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे दुध, सब्जा बी, फालुदा शेव आणि ice-cream.

फालुदा आणखीनही वेगवेगळ्या चवीत खायला मिळतो. जसे चोकोलेट, रबडी, केशर…  Fruit Faluda हा अजून एक प्रकार आता लोकप्रिय होत आहे. यात फालुदा कृती साधीच असते, फक्त वरून ताजी फळे कापून लावतात.

मुंबईचा फालुदा कसा बनवायचा इथे देत आहे.

http://mejwani-recipes.blogspot.in/2015/10/rose-falooda.html


लागणारा वेळ: ४० मिनिटे 
जणांसाठी :

साहित्य: 
  • १ कप दुध 
  • २ चमचे रोज सिरप / सरबत 
  • १/४ कप शेवया 
  • २ चमचे सब्जा बी 
  • २ कुल्फी 
  • पिस्ता 
  • बदाम 
कृती:
१. १/२ कप पाण्यात सब्जा बी १५ मिनिटे भिजत घाला.  बाजूला ठेऊन द्या.
२. शेवया २ कप पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. भांड्यात काढून बाजूला ठेवा.
३. दुध उकळवून घ्या. थंड करत ठेवा.
४. थंड झालेल्या दुधात रोज सिरप टाका. निट हलवून घ्या. हे झाले रोज मिल्क.
५. दोन मोठे ग्लास घ्या. त्यात तळाला रोज सिरप टाका.
६. त्यात भिजवलेले सब्जा बी टाका. वरून  शिजवलेल्या शेवया टाका.
७. त्यात तयार रोज मिल्क टाका.
८. त्यावर कुल्फी ठेवा. हवे असल्यास कुल्फीवर थोडे-थोडे रोज मिल्क पसरावा.
९. बारीक कापलेल्या बदाम-पिस्त्याने सजवा. आणि खायला द्या.
Rose Falooda - रोज फालुदा Rose Falooda - रोज फालुदा Reviewed by Prajakta Patil on October 05, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.