Doodhi Thepla - दुधी ठेपला

 ठेपला गुजराथी लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असा प्रकार आहे. ठेपल्याचे मुळा, मेथी असे विविध प्रकार आहेत.

दुधी ठेपल्याला लोकी ठेपला असे  पण म्हणतात. साधारण ठेपला गव्हाच्या पिठाच्या बनवतात, पण तुम्ही ज्वारी किंवा बाजरी वापरून त्याला अजून पौष्टिक बनवू शकता.लागणारा वेळ : २५ मिनिटे 
जणांसाठी :

साहित्य: 
  • १/४ दुधी, किसलेला 
  • २/३ कप गव्हाचे पीठ 
  • १/८ कप दही 
  • १/८ चमचे हळद 
  • १/२ चमचा लाल तिखट 
  • १/३ चमचे तेल 
  • मीठ 
  • १/४ चमचे आले पेस्ट 
  • १ चमचा कोथिंबीर 
  • लोणी/तूप/तेल वरून लावण्यासाठी
कृती:
१. वरील सर्व साहित्य एकत्र करा (लोणी/तूप/तेल सोडून) आणि नीट एकजीव करा. चांगले मळून मऊ गोळा तयार करा. गरज लागल्यास पाणी वापरा.
२. चांगले मळून ५ गोळे तयार करा.
३. त्यातील एक गोळा घ्या, तळव्यांमध्ये ठेवा थोडासा दाबा.
४. पोळपाटावर एक गोळा घेऊन तो पोळीप्रमाणे लाटा.
५. Gas वर तवा ठेऊन तो तापल्यावर त्यात पराठा टाका.
६. दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
७. आता दोन्ही बाजूनी लोणी/तूप/तेल  लावा.
८. तयार ठेपला  प्लेट मध्ये काढून घ्या. उरलेल्या गोळ्यांचे असेच ठेपले बनवून घ्या.
९. गरम गरम ठेपला भाजी बरोबर किंवा लोणच्याशी खायला द्या. 

 
Doodhi Thepla - दुधी ठेपला Doodhi Thepla - दुधी ठेपला Reviewed by Prajakta Patil on October 04, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.