Malai Chicken - मलई चिकन

श्रावण महिना संपल्यानंतर सगळेच मांसाहार चालू करतात. ही डिश खास चिकन प्रेमींसाठी आहे. बनवायला अतिशय सोपी आणि खायला चविष्ठ .

http://mejwani-recipes.blogspot.in/2015/09/malai-chicken.html

लागणारा वेळ: ६० मिनिटे
जणांसाठी :

साहित्य:
 • १/२ किलो चिकन 
 • १ कांदा, बारीक चिरून 
 • १ कप फ़्रेश क्रीम 
 • २ कप दुध 
 • २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
 • १ चमचा वेलची पावडर 
 • १ चमचा आले, बारीक चिरून 
 • कोथिंबीर, बारीक चिरून 
 • १/२ चमचा आले पावडर 
 • ३ चमचे व्हाईट पेपर पावडर 
 • १ चमचा कसुरी मेथी 
 • २ चमचे गरम मसाला 
 • १ चमचा आले-लसुन पेस्ट 
 • केशर 
 • बदाम,काजू बारीक कापून 
 • मीठ 
खडा मसाला
 • २ - ३ वेलच्या 
 • १ दालचीनी 
 • २ - ४ लवंगा 
 • २ चमचे जिरे 
 • ३ - ४ काळी मिरी 
 • १ जावित्री 
कृती :
१.  चिकनच्या तुकड्यांना आले-लसुन पेस्ट, मीठ, व्हाईट पेपर पावडर चोळून १५-२० मिनिटे बाजूला ठेऊन द्या.
२. खडा मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३. मध्य आचेवर कढई ठेवून त्यात कांदा,हिरव्या मिरच्या आणि क्रीम टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.
४. आता त्यात चिकन टाकून परतून घ्यावे.
५. आता त्यात आले, आले पावडर, कोथिंबीर, व्हाईट पेपर पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला, आणि केशर टाकावे. मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे.
६. कोथिंबीर, बदाम आणि काजू नी सजवावे.
७. नान किंवा गरम भात बरोबर वाढावे.


Malai Chicken - मलई चिकन Malai Chicken - मलई चिकन Reviewed by Prajakta Patil on September 26, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.