Lemon Cake - लेमन केक


रुचकर लेमन केक

http://mejwani-recipes.blogspot.in/2015/09/lemon-cake.html
Cooking Time : 1 hour
Servings : 5

साहित्य :
 • १ १/४ कप मैदा 
 • १ १/२ चमचा बेकिंग पावडर 
 • १/२ चमचा मीठ 
 • १ कप साखर 
 • २ चमचे लिंबू रस 
 • १/४ कप मार्गारीन 
 • ३/४ कप दुध 
 • १ अंड 
आयसिंग :
 • ३/४ कप साखर 
 • १ चमचा मार्गारीन, वितळवून 
 • ३ चमचे लिंबू रस
कृती :
१. ओवन ३५० डिग्रीज ला गरम करून घ्या. ८-इंचाचा बेकिंग ट्रेला बटर लावून बाजूला ठेऊन द्या.
२. साखर, मीठ, मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करा. त्याचे दोन भाग करून वेगळे ठेऊन द्या.
३. त्यातील एका भागात अंडे फोडून ओता. एकजीव करून घ्या.
४. १/४ कप वितळलेले मार्गारीन दुसऱ्या भागात ओता.
५. आता दोन्ही भागांवर दुध ओतून एकजीव करून घ्या.
६. हे मिश्रण ३० मिनिटे ओव्हन मध्ये भाजून घ्या. झाल्यावर सुरी केकमध्ये घालून बघा. जर सुरी स्वच्छ बाहेर आली तर केक झाला असे समजावे.

 आयसिंग कृती:
१. पिठीसाखर, १ चमचा वितळवलेले मार्गारीन आणि लिंबू रस एकत्र करा. हे आयसिंग तयार केकवर पसरा.

केकचे तुकडे करून प्लेट मध्ये खायला द्या.
Lemon Cake - लेमन केक Lemon Cake - लेमन केक Reviewed by Prajakta Patil on September 29, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.