Paneer Laddu - केशर मलई लाडू / पनीर लाडू

केशर मलई लाडू किंवा  पनीर लाडू ही अतिशय सोपी आणि चविष्ठ अशी  डिश अगदी 10 मिनिटांत बनते. येणाऱ्या दिवाळीसाठी बनवता येणारी जी तुमच्या घरच्यांसाठी आणि मित्रमंडळींसाठी एक पर्वणी ठरेल.

लागणारा वेळ : 10 मिनिटे
जणांसाठी : 10

साहित्य :
  • 200gm पनीर 
  • 3/4 कप condensed milk 
  • 1/4 कप  गरम दुध 
  • 1 चमचा साखर  
  • 1/2 चमचा  वेलची पावडर 
  • 2 - 3 थेंब केवडा इसेन्स 
  • केशर 
  • 1 चमचा तूप 
  • पिस्ते, बदाम काप
कृती :
१. पनीरचे लाडू बनवण्यासाठी पनीर न वापरता चुरा करून वापरावे.  जर घरगुती पनीर वापरत असाल तर पाण्यात वितळवून चुरा करण्याची गरज नसते. पण जर तुम्ही दुकानातले पनीर वापरणार असाल तर तुम्हाला ते उकळत्या पाण्यात ठेवावे आणि थंड झाल्यावर हातावर घेऊन चुरा करावा.
२. चुरा पनीर, condensed milk, ,दुध, केशराच्या काड्या आणि वेलची पावडर एकत्र करा.
३. Gas चालू करून, कढई ठेवा आणि वरील मिश्रण व चमचाभर तूप त्यात ओता.  मिश्रण जाड होईपर्यंत हलवत रहा.
४. एका ताटलीला तूप लावून ठेवा. मिश्रण थंड झाले कि ताटलीत ओता आणि चांगले मळून घ्या.
५. त्यातले थोडे-थोडे  हातावर घ्या आणि लाडू बनवा.
६.  काजू आणि पिस्त्याच्या तुकड्यांनी सजवा.
७. plate मध्ये ठेवा आणि खायला द्या.

Paneer Laddu - केशर मलई लाडू / पनीर लाडू Paneer Laddu - केशर मलई लाडू / पनीर लाडू Reviewed by Prajakta Patil on September 24, 2015 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.