Raw Mango Pickle - कच्च्या आंब्याचे लोणचे


साहित्य:

  • 1 किलो कच्चे आंबे 
  • १ कप मोहरी पावडर 
  • १०० ग्राम लाल तिखट 
  • २ चमचे मोहरी 
  • १/२ कप मेथीचे दाणे 
  • २ चमचे हळद 
  • १ १/२ इंच हिंग 
  • १ १/२ चमचे मीठ, भाजून 
  • २ कप तेल 
  • २ चमचे साखर 
कृती:
१. आंबे नीट धुऊन, त्याच्या छोट्या फोडी कराव्यात. फोडी पूर्णपणे कोरड्या होऊ द्याव्यात. 
२. फोडींना मीठ, तिखट आणि हिंग चोळून साधारण तासभर मुरु द्यावे. 
३. कढईत तेल गरम करत ठेवावे, त्यात मेथी दाणे टाकून १० - १५ मिनिटे परतून घ्या. परतलेले मेथी दाणे मिक्सर मधुन फिरवून पावडर करून घ्या. 
४. कढईत २ कप तेल गरम करत ठेवावे त्यात मेथी दाणे, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. एका भांड्यात गार करत ठेवावी. 
५. दुसरया भांड्यात लाल तिखट, मोहरी पावडर, मेथी पावडर एकत्र करा. त्यात थंड झालेली फोडणी ओता. आणि नीट एकजीव करा. 
६. आता आंब्याच्या फोडी त्यात ओता. आणि नीट हलवून घ्या. 
७. आता भाजेलेले मीठ (चवीनुसार) घाला आणि नीट हलवा. 
८. तयार लोणचे काचेच्या बाटलीत भरून ठेवा. वरून कापड लावून झाकण घट्ट लावून घ्या. 

टीप:
लाल रंग येण्यासाठी तुम्ही काश्मिरी मिरच्या वापरू शकता. 
Raw Mango Pickle - कच्च्या आंब्याचे लोणचे Raw Mango Pickle - कच्च्या आंब्याचे लोणचे Reviewed by Prajakta Patil on June 22, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.