Egg Fritters

पावसात आपण नेहमी गरमा-गरम कांदा-बटाटा भजी खातो. या वेळी जराशी वेगळी पण अतिशय चविष्ट अशी अंडा-भजी करून बघा.

Read Egg Fritters In English

जणांसाठी -
लागणारा वेळ - २० मिनिटे

साहित्य :

  • अंडी - ४
  • कांदा - १/४ कप बारीक चिरून 
  • सोया सॉस 
  • मैदा - २ चमचे 
  • हळद - १/४ चमचे 
  • कॉर्न फ्लोअर - २ चमचे 
  • पाणी, मीठ,तिखट - गरजेनुसार 
  • तेल - तळण्यासाठी 
कृती:

१. अंडी उकडून घ्या.
२. एका भांड्यात कांदा, सोया सॉस, मैदा, हळद, कॉर्न फ्लोअर, मीठ,तिखट एकत्र घेऊन, त्यात थोडे-थोडे पाणी  घालत भजी सारखे पातळ पीठ करावे.
३. उकडलेल्या अंड्याचे दोन भाग करावेत.
४. कढईत तेल गरम करत ठेवावे.
५. आता प्रत्येक भाग तयार पिठात बुडवून तेलात डीप-फ्राय करावा.
६. गरम-गरम अंडा भजी टोमाटो सॉस बरोबर खायला द्या. 
Egg Fritters Egg Fritters Reviewed by Prajakta Patil on June 20, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.