Mango - Banana Smoothie - आंबा - केळे स्मुदी

लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी :

साहित्य : 
  • १ आंबा 
  • १ केळे 
  • १ कप दही, प्लेन किंवा फ्लेवर्ड 
  • १ चमचा मध 
  • १ कप दुध 
कृती :
१. आंब्याची साले काढून, त्याच्या फोडी करून घ्या. 
२. केळ्याची साले काढू, त्याच्याही फोडी करून घ्या. 
३. आंब्याच्या फोडी, केळ्याचे तुकडे आणि इतर साहित्य ब्लेंडरमध्ये घाला. 
४. मिश्रण घट्ट आणि मऊ होईपर्यंत ब्लेंडर मधून फिरवून घ्या. 
५. ग्लास मध्ये स्मूदी काढून घ्या आणि फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा. 
६. ज्या दिवशी कराल, त्याचा दिवशी वापरा. 

Mango - Banana Smoothie - आंबा - केळे स्मुदी Mango - Banana Smoothie - आंबा - केळे स्मुदी Reviewed by Prajakta Patil on May 22, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.