Frozen Mango yogurt - आंब्याचे दही

परवा साधारण २५ - ३० पाहुणे जेवायला आले होते. उन्हाळा असल्याने घरात दही भरपूर होते. पाहुणे जेऊन भरपूर दही उरले.  ते दही मग मी फ्रीज मध्ये ठेऊन दिले.

आता दही खूप उरले असल्याने त्याचे काय करावे हा विचार मी करत होते. तसा अपडेट ही सोशल साईट वर टाकला. आणि क्षणात मला भरपूर पर्याय मिळाले. त्यातून मी हा आंब्याचे गोठवलेले दही करायचा विचार केला. कारण आंब्याचा मोसम असल्याने अर्थात घरात आंबे भरपूर होते.

तयार पदार्थ मला आवडला म्हणून इथे तो देत आहे. नक्की करून बघा. थोडी मेहनत लागेल पण सर्वात शेवटी तुम्ही केलेला पदार्थ खूप छान होईल हे नक्की.


जणांसाठी :

साहित्य: 
  • २ कप दही, पूर्णपणे पाणी काढून
  • २ आंबे 
  • ३/४ कप पिठीसाखर 
  • १/४ चमचा लिंबू रस 
  • सुकामेवा, पातळ काप करून 
  • १/२ चमचा मध 
  • मीठ, चिमुटभर 
कृती:
१. आंबे चांगले धुऊन, साले काढा आणि त्याचे बारीक कप करा. 
२. फूड-प्रोसेसर मध्ये आंब्याचे तुकडे, १/२ कप दही आणि लिंबू रस एकत्र करून फिरवा. 
३. दुसऱ्या एका भांड्यात, साखर आणि उरलेले दही एकत्र करून नित फेटून घ्या. 
४. आता, साखर आणि आंब्याचे मिश्रण एकत्र करून फ्रीज मध्ये २ - ४ तास  ठेवून द्या. 
५. ४ तासानंतर बाहेर काढून, पुन्हा फूड-प्रोसेसर मध्ये फिरवून घ्या. परत २ तास फ्रीज मध्ये ठेवा. 
६. आता बाहेर काढून परत प्रोसेसर फिरवून घ्या. जितके जास्त तुम्ही फेटाल, तितके जास्त मिश्रण मऊ आणि घट्ट होईल. 
७. आता परत अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये मिश्रण ठेवा. आणि हीच कृती परत करा जोपर्यंत मऊ आणि क्रिमी मिश्रण मिळत नाही. 
८. आता कापलेला सुकामेवा पसरून तयार आंब्याचे दही फ्रीज मध्ये ठेवा. 
९. वाढायच्या १५ मिनिटे आधी बाहेर काढा. 
१०. तसेच हे दही तुम्ही बर्फाच्या ट्रे मध्ये भरू शकता. 
Frozen Mango yogurt - आंब्याचे दही Frozen Mango yogurt - आंब्याचे दही Reviewed by Prajakta Patil on May 24, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.