Shahi Potato - शाही बटाटे

उपवासासाठी खास, करायला एकदम सोपी. नक्की करून बघा. 
लागणारा वेळ: २० मिनिटे 
जणांसाठी: २-३

साहित्य:
  • २५0 ग्रॅम लहान बटाटे 
  • १ वाटी दूध
  • २ टे. स्पू. काजू पूड
  • २ टी. स्पू. हिरव्या मिरच्या
  • जिरेपूड
  • तूप 
  • चिमूटभर साखर 
  • चवीनुसार मीठ.
कृती: 
१.बटाटे उकडून घ्यावेत, सोलून काट्यानं टोचून घ्यावेत
२.हिरव्या मिरच्या आणि जिरे मिक्सरमधून बारीक वाटावेत.
३.फ्राय पॅनमध्ये तूप घालून जिरे-मिरची पेस्ट घालून फोडणी करावी. 
४.त्यात मीठ घालावं, त्यावर काट्यानं चोचवलेले अख्खे बटाटे परतून घ्यावे. 
५.८-१0 मिनिटं सारखं हलवून परतल्यावर दूध घालून सरसरीत मिश्रण हलवावं. 
६.दुधाला उकळी आल्यावर त्यात काजूपूड घालावी. 
७.काजूपूडऐवजी दाण्याचा कूट घातला तरीही चालतं, आवडीप्रमाणे घट्टसर ठेवावी.
८.शिंगाड्याच्या पुर्‍यांबरोबर शाही बटाटे छान लागतात.
Shahi Potato - शाही बटाटे Shahi Potato - शाही बटाटे Reviewed by Prajakta Patil on February 18, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.