Marie, Almonds and Cocoa Roll - मारी बिस्कीट, बदाम आणि कोका पावडर रोल

तुमच्या Valentine's Day साठी एकदम सोपी, पटकन होणारी खास पाक-कृती


साहित्य :
 • १२-१३मारी बिस्कीट, चुरा केलेली 
 • १-२ चमचे condensed milk
  condensed milk
  condensed milk
 • ६ चमचे कोका पावडर 
 • १ चमचा दुध 
 • १/२ चमचा पिठीसाखर 
 • १/२ कप बदाम पावडर 
 • १/४ कप dessicated coconut 
 • १/२ चमचा दुध 
 • १ चमचा बटर, वितळवून
 • १/४ कप पिठीसाखर 
कृती:
१. एका बाउल मध्ये बिस्किट्स, condensed मिल्क, कोका पावडर, १/२ चमचा साखर एकत्र करा.
२. आता थोडे थोडे दुध घालून, चांगले मळून घेऊन, चपाती सारखी कणिक तयार करा. तयार कणिक बाजूला ठेवून द्या.
३. दुसऱ्या एका बाउल मध्ये, बदाम पावडर, १/२ चमचा दुध, बटर, dessicated coconut आणि १/४ कप साखर एकत्र करा.
४. आता मळलेल्या पिठाची एक जाड पोळी लाटून घ्या.
५. पोळीवर बदाम आणि नारळाचे मिश्रण सारखे पसरा.
६. आता पोळीच्या कडा नीट उचलून तिची गुंडाळी करा. कडा चिकटवून टाका.
७. तयार रोल aluminum foil मध्ये ठेऊन, फ्रीज मध्ये २-३ तास सेट ह्वायला ठेऊन द्या.
८. सेट झाल्यावर, रोल foil मधून काढून त्याचे १/२" जडे तुकडे करा. आणि खायला दया.
Marie, Almonds and Cocoa Roll - मारी बिस्कीट, बदाम आणि कोका पावडर रोल Marie, Almonds and Cocoa Roll - मारी बिस्कीट, बदाम आणि कोका पावडर रोल Reviewed by Prajakta Patil on February 06, 2014 Rating: 5

2 comments:

Unknown said...

HA ROLL KITI DIWAS TIKATO...

Prajakta Patil said...

Generally ha roll aytya veli kartat ani lagech samplela changla karan tyat naral asto. Tari hi fridge madhe to sadharan 2 divas tikto.

Powered by Blogger.