Heart Shaped Pizza - हार्ट शेप पिझ्झा

हार्ट शेप पिझ्झा हा Valentine Day साठीचा एक लोकप्रिय पदार्थ ! प्रत्येक वेळी बाहेरून मागवून खाण्यापेक्ष्या जर हा पदार्थ घरीच करता आला तर ?

खालील सूचनांप्रमाणे पिझ्झा घरच्या घरी तयार करून तुमच्या आवडत्या व्यक्तीला चकित करा.


लागणारा वेळ: ३० मिनिटे
जणांसाठी :

साहित्य:
  •  पिझ्झा पीठ (बाजारात तयार मिळते)
  • पिझ्झा सॉस 
  • किसलेले चीज 
  • १/४ कप कांदा, बारीक चिरलेला 
  • मीठ, चवीनुसार 
  • १ क़प  मशरूम, चिरून 
  • २ कप छोटे टोमाटो, चिरून 
  •  आवडत असलेले कोणतेही topping
कृती :
१. पाकीटावर लिहिल्याप्रमाणे पिझ्झ्याचे पीठ मळून घ्या.
२. हृदयाचा आकार देण्यासाठी, प्रथम पीठ गोलाकार लाटून घ्या.
३. सुरीच्या साह्याने लाटलेल्या पिझ्झ्याच्या पोळीला वरून २ गोल आणि खाली टोकदार टोक काढून घ्या.
४. आता चमच्याच्या मागच्या बाजूने पिझ्झा सॉस लावून घ्या.
५. आता toppings वरून पसरा. (कोणतेही आवडते topping तुम्ही वापरू शकता). आपण ह्या पिझ्झ्यासाठी छोटे टोमाटो, मशरूम, चीज आणि कांदा वापरला आहे. जर मांसाहारी पिझ्झा आवडत असेल तर मटन, चिकन किंवा कोलंबी देखील वापरू शकता.
६.  आता हा पिझ्झा ओव्हन मध्ये ठेऊन तापमान नीट सेट करा. शक्यतो, ३५०DF वर १५-२० मिनिटात पिझ्झा तयार होतो.  नीट लक्ष ठेवा म्हणजे पिझ्झा जळणार नाही.
७. तयार पिझ्झा ओव्हन मधून बाहेर काढा.
८. प्लेट मध्ये गरम-गरम पिझ्झा ठेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीबरोब share करा.

No comments:

@templatesyard