Chicken Kofta Curry - चिकन कोफ्ता करी

 चटपटीत चिकन कोफ्ता करी बनवा आणि तुमचा Valentine's Day स्पेशल बनवा !


साहित्य:
 • ४५० ग्राम बारीक केलेले चिकन
 • १ चमचा आले-लसुन पेस्ट
 • १ कांदा, बारीक कापलेला
 • १ टोमाटो, प्युरी करून
 • १ चमचा गरम मसाला
 • लाल तिखट, चवीनुसार
 • १ लसुन पाकळी, बारीक चिरून
 • १ अंड 
 • १/२ red bell pepper, बारीक 
 • ३ वेलच्या 
 • कोथिम्बिर 
 • मीठ, चवीनुसार 
 • हळद 
 • तेल 
 • पाणी, गरजेनुसार 
 • २ चमचे दही 
 • जीरा पावडर 
कृती:
१. बारीक केलेले चिकन नीट धुऊन घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्या.
२.एका मोठ्या भांड्यात चिकन, आले-लसुन पेस्ट, लाल तिखट, गरम-मसाला, अंड, red bell pepper, मीठ आणि कोथिम्बिर एकत्र करून एकजीव करून घ्या.
३. कढई गरम करून त्यात ४-५ चमचे तेल टाका.
४. हाताच्या तळव्याला थोडे पाणी लावून घ्या. आणि त्यावर चिकनच्या मिश्रणातील थोडेसे मिश्रण घेऊन गोळा बनवा. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
५. कढईतील तेल पुरेसे गरम झाले की चिकनचे गोळे सोडून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
६. तळेलेले गोळे बाजूला ठेऊन द्या.

करी बनवायची कृती:
१. खलबत्यात वेलची आणि लसून पाकळ्या ठेचून घ्या.
२. मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करून घ्या.
३. आता चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
४. त्यात हळद, लाल तिखट, जिरे आणि मीठ घालून परता.
५. आता टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.
६. भांड्याला सर्व बाजूने तेल सुटायला लागले कि धणेपूड, गरम मसाला आणि जिरे पावडर घालून मंद आचेवर परतून घ्या.
७. आता दही घालून सारखे हलवत रहा.
८. मिश्रणात पाणी घालून, झाकण ठेऊन उकळी येऊ द्या.
९. चव घेऊन मीठ आणि मसाले बरोबर आहेत का बघा नसतील तर चवीनुसार घाला.
१०. मंद आचेवर, एक एक कोफ्ता उकळत्या करी मध्ये सोडा.
११. कढईवर झाकण ठेऊन कोफ्ते १०-२० मिनिटे शिजवून घ्या.
१२. २० मिनिटांनी आच बंद करून, करी निट हलवून घ्या.
१३. बारीक चिरलेल्या कोथिम्बिर ने सजवा.
१४. गरम-गरम भात, पोळी किंवा चपाती बरोबर वाढा.

टीप:
 • कोफ्त्याचा आकार छोटा करावा म्हणजे ते पटकन शिजतात. 
 • चिकन ऐवजी दुसरे कोणतेही मटन वापरून ही कोफ्ता करी करता येते.
Chicken Kofta Curry - चिकन कोफ्ता करी Chicken Kofta Curry - चिकन कोफ्ता करी Reviewed by Prajakta Patil on February 06, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.