Black forest केकलागणारा वेळ : १५ मिनिटे
जणांसाठी : १ केक

साहित्य :
  • १ ७" चोकोलेट स्पॉंज केक 
  • ४ कप whipped क्रीम 
  • १ कप चेरी 
  • १ मोठा चोकोलेट बार 
  • ३/४ कप पाणी 
  • १/२ कप साखर 
कृती :
१. Non-stick pan मध्ये साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर ठेऊन द्या. सतत हलवत रहा.
२. ५ मिनिटांनी pan gas वरून काढून बाजूला ठेऊन द्या. साखरेचा पाक तयार झाला.
३. चोकोलेट केक मधून आडवा कपा म्हणजे त्याचे ३ भाग होतील.
४. त्यातील १ भाग घेऊन त्यावर २ चमचे साखरेचा पाक नीट पसरा.
५. आता त्यावर  १ कप whipped cream पसरा.
६. त्यावर थोड्याश्या चेरी घेऊन गोलाकार लावा.
७. आता केकचा दुसरा भाग घेऊन, वरील ४ ते ६ प्रमाणे कृती करा.
८. आता सर्वात वरचा भाग घेऊन त्यावर साखरेचा पाक पसरा.
९. उरलेले whipped cream केक च्या वर आणि बाजूने लावून घ्या.
१०. चोकोलेटचे तयार केलेले कर्ल्स केक च्या वरती आणि बाजूने लावा.
११. आणि उरलेल्या सर्व चेरी केक वर गोलाकार लावा.
१२. तयार केक फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेऊन द्या.
१३. खायच्या आधी बाहेर काढून, काप करून खायला द्या.

चोकोलेट कर्ल्स तयार करण्याची कृती :
१. चोकोलेट बार गरम असेल तर कापा आणि थंड असेल तर किसून घ्या.
२. सुरीच्या साह्याने बार चे छोटे आणि मोठे, पातळ कर्ल्स करून घ्या.
३. टुथपिक च्या मदतीने तयार कर्ल्स केकवर ठेवा.
Black forest केक Black forest केक Reviewed by Prajakta Patil on February 06, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.