Ratalyache Cutlet - रताळ्याचे कटलेट


जणांसाठी :
५ - ६
लागणारा वेळ : ३० - ३५ मिनिटे

साहित्य :
  • ५०० ग्रॅम रताळी 
  • आलं - मिरचीचे वाटण 
  • गरजेपुरते साबुदाण्याचे पीठ 
  • १ चमचा लिंबाचा रस 
  • मीठ, गरजेनुसार 
  • थोडी उपवासाची भाजणी 
  • तेल किंवा तूप 
  • जिरेपूड 
कृती :

१. रताळी स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावीत आणि साले काढून किसावीत. 
२. त्यामध्ये आलं - मिरचीचे वाटण, मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस आणि गरजेनुसार साबुदाण्याचे पीठ घालून चांगले एकत्र करावे. 
३. नंतर वरील मिश्रणाचे छोटे - छोटे चपटे गोळे करावे. 
४. वरील गोळे उपवासाच्या भाजणीत घोळून तळावे किंवा shallow fry करावे. 
५. रताळ्याचे कटलेट खायला देताना सोबत खजुराची चटणी द्यावी . 
Ratalyache Cutlet - रताळ्याचे कटलेट Ratalyache Cutlet - रताळ्याचे कटलेट Reviewed by Prajakta Patil on October 12, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.