Shahi Tukda - शाही तुकडा

शिळ्या ब्रेड पासुन बनवलेला गोड, चविष्ट आणि सोपा पदार्थ!

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : ३ - ४
 साहित्य:
  • ६ शिळे पाव, त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करून
  • ८ कप दुध
  • ३ चमचे साखर
  • १ कप साखर, पाक तयार करण्यासाठी
  • १ कप पाणी
  • १/२ कप तूप
  • १/२ चमचा वेलची पावडर
  • १/२ चमचा केशर
  • २ चमचे बदाम, पिस्ता, काजू तुकडे
  • खजुराचा पाक 
कृती :
१.जाड बुडाच्या पातेल्यात दुध घेवून मंद आचेवर  वर ४० - ४५ मिनिटे  उकळवावे. आहे त्या दुधाच्या १/४ होईपर्यंत सतत ढवळत रहावे. अशा आटवलेल्या दुधाला "रबडी" म्हणतात.
२. त्यामध्ये साखर, वेलची पावडर, केशर घालून gas बंद करून एका बाजूला ठेवावे.
३. साखर आणि पाणी एकत्र करून थोडा वेळ उकळवा म्हणजे साखरेचा पाक तयार होईल.
४ . तव्यामध्ये तूप गरम करत ठेवावे. 
५. त्यामध्ये पावाचे तुकडे सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावेत.
६. आता तळलेले पावाचे तुकडे साखरेच्या पाकात थोडा वेळ भिजवून ठेवावेत. 
८. आता हे साखरेच्या पाकातील तुकडे एका डिश मध्ये काढा. 
९. ह्या तुकड्यांवर तयार रबडी थोडी थोडी ओता. 
१०. बारीक केलेले बदाम, पिस्ता, काजू आणि खजुराचा पाक पसरवून सजवावे.
११. पावाचे तुकडे गरम, कुरकुरीत असताना किंवा थंड झाल्यावर सर्व्ह करा. 
Shahi Tukda - शाही तुकडा Shahi Tukda - शाही तुकडा Reviewed by Prajakta Patil on August 01, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.