Curd Idli - दही इडली

लागणारा वेळ: १५ -२० मिनिटे
जणांसाठी : ४-५

साहित्य :
 • १० उरलेल्या इडल्या
 • ४ - ५ कप दही
 • १ कप दुध / पाणी
 • १ चिमुटभर साखर
 • मीठ (चवीनुसार )
 • १ चमचा काजू
 • २ चमचे किसलेले ताजे खोबरे
 • २ हिरव्या मिरच्या
 • १/४ चमचा मोहरी
 • ५ -६ कडीपत्त्याची पाने
 • १/२ चमचा उडीद डाळ
 • ३ -४ सुक्या लाल मिरच्या
 • १ चमचा तेल
कृती :
१. एका इडलीचे ४ तुकडे या प्रमाणे सर्व इडल्याचे तुकडे करून घ्यावेत.
२. दह्यामध्ये दुध किंवा पाणी घालून चांगले एकजीव करून त्यामध्ये गरजेनुसार साखर व मीठ घालावे.
३. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकवी. मोहरी तडतडली कि त्यामध्ये उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या आणि कोथिंबीर घालावी.
४. काजू, हिरव्या मिरच्या, किसलेले खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून दह्यामध्ये घालावे. 
५. सर्व्ह करायच्या १/२ तास अगोदर इडली दह्यामध्ये घालावी म्हणजे ती फुगत नाही.
६. फ्रीज मध्ये ठेऊन थंडगार करून खायला द्यावी. 

No comments:

@templatesyard