Shilya Chapatichi Bhakarvadi - शिळ्या चपातीची भाकरवडी

बऱ्याच वेळा आपले रात्रीचे जेवण उरते. मग आपण एकतर ते दुसऱ्या दिवशी खातो किंवा काहीजण त्यापासून रुचकर असे पदार्थ करतात. दुकानातील खमंग भाकरवडी सगळ्यांनाच आवडते. तीच भाकरवडी घरी बनवली तर आणि तीसुद्धा रात्रीच्या उरलेल्या चपातीची ! मस्त आयडिया आहे ना ! खाली रात्रीच्या उरलेल्या चपातीपासून भाकरवडी कशी बनवावी याची कृती दिली आहे. नक्की करून बघा.लागणारा वेळ: ३० मिनिटे
साहित्य :
 • शिळ्या चपात्या
 • बेसन
 • लाल तिखट
 • हळद
 • मीठ
 • लसूण
 • जिरे
 • तीळ
 • बडीशेप
 • किसलेले खोबरे
 • शेव
 • तेल 

कृती :
१. आले, बडीशेप, लाल तिखट एकत्र करून त्यांची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करावी.
२. एका बाऊलमध्ये बेसन, पाणी, हळद, मीठ, जिरे आणि आले-लाल तिखट पेस्ट एकत्र करावी.
३. आता एक चपाती घेवून त्यावर तयार केलेला मसाला पसरवावा आणि त्यावरती शेव, किसलेले खोबरे  आणि तीळ  घालावे.
४. चपातीचा रोल करून बाकरवडी सारखे लहान लहान तुकडे करावेत.
५. कढईत तेल गरम करून बाकरवडी दोन्ही बाजूने सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्यावी.
६. आता सर्व बाकरवड्या एका डिशमध्ये काढून घ्या. वरून शेव आणि किसलेले खोबरे पसरवून सजवा. 
७. तयार बाकरवडी गरम किंवा थंड सर्व्ह करू शकता.
Shilya Chapatichi Bhakarvadi - शिळ्या चपातीची भाकरवडी Shilya Chapatichi Bhakarvadi - शिळ्या चपातीची भाकरवडी Reviewed by Prajakta Patil on July 16, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.