Leftover Rice-Watermelon Paratha

 रात्रीचा उरलेला भात, वरण आणि कोबीची भाजी यांपासून केलेले चविष्ट, खरपूस आणि तिखट पराठे ! नक्की करून बघा.

लागणारा वेळ: ३० - ३५ मिनिटे
साहित्य :
 • उरलेला भात, डाळ  आणि कोबीची भाजी
 • गव्हाचे पीठ
 • सोयाबीनचे पीठ
 • बेसन
 • मीठ
 • हळद
 • कलिंगडचा पांढरा भाग, तुकडे करून
 • १ कांदा
 • १ टोमाटो
 • जिरे
 • हिंग
 • मोहरी
 • लाल तिखट
 • धने पूड
 • कोथिंबीर
सारणाची कृती  :
१. कढईत तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि त्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग घालावे.   
२. त्यामध्ये कांदा घालून थोडा वेळ परतावे. टोमाटो घालून पुन्हा परतावे. 
३. वरील मिश्रणात लाल तिखट, धने पूड, हळद घाला. 
४. त्यामध्ये कलिंगडाचे पांढऱ्या भागाचे तुकडे घालुन परतावे.
५. कढई वर झाकण ठेवून कलिंगडाचे तुकडे थोडा वेळ शिजू द्या.  
६. पराठ्यामध्ये भरावे लागणारे सारण तयार झाले.

पराठ्याची कृती :
१. भात, डाळ, कोबीची भाजी  एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
२. ते मिश्रण एका बाऊल काढून त्यामध्ये बेसन, सोयाबीनचे पीठ, गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घ्यावे.
३. त्यामध्ये चिमुटभर हळद, धने पूड आणि चवीपुरतं मीठ घालून मळून घ्यावे.
४. पीठ झाकून एका बाजूला ठेवून द्या.
५. वरील पीठाचे छोटे- छोटे लहान गोळे करावे.
६. हातावर पिठाचा गोळा घेऊन त्याला सपाट करून त्यामध्ये कलिंगडाचे सारण भरावे.
७. त्याच्या कडा पूर्णपणे निट बंद कराव्यात.
८. कणकेची बंद केलेली बाजू वर घेऊन गोळा हलक्या हातानी दाबावा.
९. पोळपाटावर थोडी पिठी पसरवून, कणकेची बंद केलेली बाजू पिठावर ठेवून हलक्या हाताने लाटावे.
१०. लाटताना त्यामधील सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
११. तवा गरम करून पराठा सर्व बाजूनी भाजून घ्यावा. पराठा खाली लागू नये म्हणून तूप किंवा तेल सर्व बाजूने पसरवावे.
१२. गरम गरम परोठे दही किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
Leftover Rice-Watermelon Paratha Leftover Rice-Watermelon Paratha Reviewed by Prajakta Patil on July 17, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.