Menu

Egg Biryani - अंडा बिर्याणी


स्वादिष्ट, मसालेदार अंड्याची बिर्याणी कशी बनवाल याची कृती खाली दिली आहे.

लागणारा वेळ : ३० - ४०मिनिटे
जणांसाठी : ३ - ४

साहित्य :
  • ४ कप बासमती तांदूळ, भिजवलेले
  • ६ उकडलेले अंडी, साले काढून,मध्ये उभी चीर देवुन
  •  तळण्यासाठी तेल
  • २ मध्यम टोमाटो, बारीक चिरून
  • २ मध्यम कांदे, उभे पातळ काप करून
  • २ चमचे आले - लसुण पेस्ट
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • २ हिरव्या वेलची
  • ३ लवंग
  • १ दालचिनी
  • कोथिंबीर, बारीक चिरून
  • १/२ कप दही
  • १ चमचा तूप
  • १ चमचा गरम मसाला
  • २ चमचे काजू
  • १० मिरी
कृती :
१. उकडलेल्या अंड्यांना लाल तिखट, दही, हळद, गरम मसाला पावडर आणि मीठ चोळून एका बाजूला ठेवून द्यावे.
२. कढईत तेल गरम करून त्यामध्ये थोडा कांदा तळून घ्यावा आणि एका बाजूला ठेवून द्यावा.
३.आता त्याच कढईत वेलची, दालचिनी, लवंग घालून हलवावे आणि त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावा.
४. त्यामध्ये आले- लसूण पेस्ट, काजू घालून २ -३ मिनिटे परतून लगेच टोमाटो घालून २ -३ मिनिटे शिजू द्यावे.
५. वरील मिश्रणात कोथिंबीर आणि पुदिना घालून २ - ३ मिनिटे शिजवावे. त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून थोडा वेळ परतून पुरेसे पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे.
६. पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये बासमती तांदूळ आणि तूप घालून चांगले एकत्र करा.
 ७. आता तांदुळामध्ये मसाला चोळलेली अंडी घालून २० - ३० मिनिटे मंद आचेवर भात शिजू द्यावा. 
८. भात शिजल्यानंतर हलक्या हाताने हलवावा.  तळलेले कांद्याचे पातळ काप आणि कोथिंबीर यांनी सजवावा.
९. गरम गरम असताना रायता बरोबर सर्व्ह करा. 

No comments:

Author

Labels