Vegetable Manchurian - व्हेज मंचूरीयन

लागणारा वेळ:  ३० मिनिटे
साहित्य : 
 • १ १/२ कप कोबी, बारीक चिरलेला
 • १/४ कप चिरलेला कांदा
 • २/३ कप किसलेले गाजर
 • १ चमचा corn flour
 • २ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
 • २ १/२ चमचे मैदा
 • १/२ चमचा हिरवी मिरची, बारीक चिरून
 • मीठ
 • काळी मिरपूड
 • तेल
Gravy चे साहित्य :
 • १/२ चमचा लसूण, बारीक चिरून
 • १ चमचा हिरवी मिरची, बारीक चिरलेली
 • १/२ चमचा सोया सॉस
 • १/२ कप पाणी
 • १ चमचा किसलेलं आलं
 • १ कप पाण्यामध्ये १/२ चमचा corn flour एकत्र करून
 • १ चमचा तेल
 • १ चिमुटभर साखर
 • मीठ
कृती :

१. एका bowl मध्ये कोबी, गाजर, कांदा, मैदा, corn flour, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ आणि मिरपूड घेऊन एकत्र करावे.
२. मिश्रणाचे लहान - लहान गोळे करावे. गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये कारण मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते, पण जर गोळे नीट होत नसतील तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालावे.
३. pan मध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे आणि tissue paper वर काढावे.

Gravy ची कृती:

१. एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, soy sauce, tomato sauce, chilli sauce घालावे. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
२. आता वरील मिश्रणात corn flour घालावे. मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ, Ajinomoto, आणि कोथिंबीर घालावी. 
३. मिश्रणाला उकळी फुटली की gas कमी करावा आणि २ मिनिटे शिजवून घ्यावे. 
४. आता तयार केलेले manchurian गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे.
५. एका डिश मध्ये तयार गरम manchurian balls घेऊन त्यावर गरम gravy टाकावी. आणि dry noodles आणि कच्चा कोबी टाकून सर्व्ह करावे.

टीप :

Manchurian गोळे अगोदर शिजवून ठेवू नये. सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर शिजवावे.

1 comment:

Unknown said...Thanks for providing such a very nice information,it is really good details
veg manchurian recipe

@templatesyard