Pravasi Mutton - प्रवासी मटण

सुट्टीमध्ये जर तुम्ही कुठे बाहेर जायचे नियोजन करत असाल तर तुमच्या डोक्यात खाण्यासाठी काय घ्यावे हा विचार येतो. बिस्किट आणि सुक्या गोष्टी बरोबर आपण बरणीत भरून Pravasi Mutton नेऊ शकतो.Pravasi Mutton हे ८ दिवस चांगले राहते. म्हणून आता काही tension घेऊ नका. चटपटीत आणि चविष्ट Pravasi Mutton बरोबर तुम्ही bag भरू शकता. 


जणांसाठी : ४ -५
लागणारा वेळ : ३० मिनिटे

साहित्य :
 • १/२ किलो ताजे मटण 
 • ३/४ कप तेल 
 • ३ लिंबांचा रस 
 • आले 
 • लसुण 
 • कोथिंबीर 
 • मीठ 
मसाल्याचे साहित्य :
 • १ कप सुके किसलेले खोबरे 
 • ३० लसूण - पाकळ्या, बारीक चिरून
 • १ कप कोथिंबीर, बारीक चिरून 
 • २ चमचे खसखस 
 • १ चमचा गरम मसाला 
 • १ चमचा लाल तिखट 
 • ४ -५ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून 
कृती :
१. मटण नीट धूऊन त्याचे १ १/२ इंचाचे तुकडे करावेत.
२. आले - लसूण - कोथिंबीर यांची पेस्ट तयार करावी.
३.आले-लसूण -कोथिंबीर पेस्ट आणि मीठ मटणाला चोळून ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.
४. कढईत तेल गरम करून मसाला चोळलेल्या मटणाचे तुकडे घालून त्यातील पाणी सुके पर्यंत शिजू द्यावे.
५. कढईत तेल गरम करून मटण तळून घ्यावे आणि  ते एका ताटात काढून घ्यावेत .
६ . त्याच कढईत आले, बारीक केलेली लसूण, कोथिंबीर तळून घ्यावी आणि एका ताटात काढावी.
७ . खसखस, सुके खोबरे भाजून ते मिक्सर मधून वाटून घ्यावे.
८. आता तळलेल्या मसाल्याच्या मिश्रणावर सुके खोबरे आणि कोथिंबीर पेस्ट घालावी.
९. तयार मसाला आणि मटण एकत्र करून नीट मिक्स करावे.
१०. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि त्यामध्ये हिंग आणि हळद घालावी. ही फोडणी मटणावर ओतावी. 
११. मटण थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून एकजीव करावे.
१२. तयार झालेले मटण एका बरणीत भरून ठेवावे.
१३. हे मटण ८ दिवस टिकते.
१४. तुम्ही जर लांब प्रवासासाठी जात असाल तर या मटणाची मजा घेवू शकता. 

No comments:

@templatesyard