Tandulacha Dhokla - तांदुळाचा ढोकळा
लागणारा वेळ : ३५ - ४० मिनिटे 
जणांसाठी :

साहित्य :
 • १ कप तांदूळ
 • १/४ उडीद डाळ
 • १ कप दही
 • १ चमचा साखर
 • मीठ (चवीनुसार)
 • १ चमचा इनो
 • ३ चमचे तेल
 • २ चमचे मोहरी
 • ७ -  ८ कढीपत्त्याची पाने
 • चिमुटभर हळद
 • २ हिरव्या मिरच्या, उभे तुकडे करून

कृती :
१. तांदूळ आणि डाळ एकत्र करून ४ -५ तास भिजत ठेवावे.
२. नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये चांगली बारीक वाटून घ्यावी.
३. तयार मिश्रण ४ ते ५ तास बाजूला ठेवावे.
४. या पिठाला इडलीच्या पीठासारखे आंबवण्याची गरज नसते. 
५. वरील मिश्रणात दही, मीठ, साखर, मिरी घालून चांगले एकजीव करावे.
६. गरजेनुसार पाणी घालून पीठ पातळ करावे.
७. ढोकळा करण्याच्या ताटलीला किंवा ढोकळा पात्राला तेल लावावे.
८. पिठामध्ये इनो घालून पीठ चांगले ढवळून घ्यावे.
९. पीठ चांगले एकजीव करून नंतर ते ढोकळापात्रामध्ये ओतून ८ ते १० मिनिटे शिजवावे.
१०. ढोकळा तयार झाल्यावर तो थोडा वेळ गार होऊ द्यावा.
११. तेलात मोहरी, कढीपत्त्याची पाने, हळद आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून ढोकळ्यावर फोडणी द्यावी.
१२. ढोकळ्याचे चमच्याने छोटे- छोटे तुकडे करून हिरवी चटणी किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे. 
Tandulacha Dhokla - तांदुळाचा ढोकळा Tandulacha Dhokla - तांदुळाचा ढोकळा Reviewed by Prajakta Patil on May 01, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.