Gajaracha Dhokla - गाजराचा ढोकळा

 मऊ आणि  हलका ढोकळा बनवणे एक कला आहे.  किसलेले गाजर घातल्याने ढोकळा अजून पौष्टिक होतो. नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी योग्य असा पदार्थ आहे.


लागणारा वेळ: ४५ - ५० मिनिटे


साहित्य :
 • २ वाट्या गाजराचा कीस
 • १ वाटी हरभरा डाळ 
 • १/२ वाटी मुगाची डाळ 
 • १/४ वाटी उडीदाची डाळ 
 • ४ -५ हिरव्या मिरच्या 
 • लहानसा आल्याचा तुकडा 
 • एका लिंबाचा रस 
 • हळद 
 • साखर 
 • जिरेपूड 
 • १/२ चमचा खायचा सोडा 
 • कोथिंबीर 
 • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. सर्व डाळी अर्धा-एक तास भिजत घालून वाटून घ्याव्यात.
२. त्यात गाजराचा कीस, वाटलेल्या मिरच्या, आलं, मीठ,हळद, साखर, लिंबाचा रस,जिरेपूड घालून जाडसर पीठ तयार करावे.
३.पीठाचे दोन भाग करावेत.
४. एका भागावर अर्धा चमचा सोडा आणि एक मोठा चमचा कडकडीत तेल घालावे.
५. मिश्रण सारखे करावे आणि एका थाळीला तेल लावून त्यात ओतावे.
६. मोदकपात्रात मिश्रण ओतलेली थाळी ठेवून १५ ते २० मिनिटे वाफवून घ्यावे.
७. तयार ढोकळा चौकोनी कापून घ्यावा.
८. एका छोट्या भांड्यात थोडे तेल घेऊन, ते गरम झाले की त्यात मोहरी  टाकावी. मोहरी तडतडली कि कढीपत्त्याची पाने टाकून gas बंद करावा.
९. तयार फोडणी ढोकाल्यांच्या तुकड्यांवर ओतावी.
१०. कोथिम्बिरिने सजवून टोमाटो केच-अप किंवा हिरव्या चटणी बरोबर खायला द्यावे.
१२. दुसऱ्या पिठाच्या भागाचे पण असेच ढोकळे करावेत.  

No comments:

@templatesyard