Badam (Almond) -Khoya Paratha - बदाम - खवा पराठा

बदाम-खवा पराठा चवीला उत्तम आणि पौष्टिक असतो. रोजच्या नाश्त्यासाठी एकदम perfect ! तसेच मुलांच्या डब्यात देण्यासाठी चांगला पर्याय आहे. हमखास करून बघण्यासारखा चविष्ट पदार्थ म्हणजे बदाम पराठा !
साहित्य :
 • १ कप बदाम 
 • १/२ कप खवा 
 • १ मोठा चमचा मैदा 
 • १/२ कप दुध 
 • १ कप पिठीसाखर 
 • वेलची पूड 
 • जायफळ पावडर 
 • तूप 

रोटीचे साहित्य:
 • १/२ कप पातळ तूप 
 • २ १/२ कप कच्च दुध 
 • २ कप मैदा 
 • १ कप गव्हाचे पीठ 
 • मीठ (गरजेनुसार )

कृती :
१. बदाम भिजत घालुन नंतर त्याची साले काढावी. .
२. साखर, दुध,साल काढलेले बदाम मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.
३. त्यामध्ये खवा आणि १ चमचा मैदा घालून परत मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
४. वरील मिश्रणात वेलची आणि जायफळ पूड घालावी आणि हे मिश्रण साधारण चीज स्प्रेडइतपत पातळ असावे.
५. तयार बदाम- खव्याचे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे .
६. २ कप मैदा आणि गव्हाचे पीठ चाळणीने चाळून घेवून त्यात चवीनुसार मीठ घालावे.
७. तूप गरम करून चाळलेल्या मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये घालावे.
८. कच्चे दुध घेवून पोळीच्या कणके प्रमाणे  पीठ भिजवावे.
९. वरील मळलेल्या पीठाचे अंदाजे १४ -१५ गोळे करावे.
१०. जेवढी शक्य होईल तेवढी पोळी मोठी करावी.
११. पोळीवर तयार केलेले बदाम - खव्याचे मिश्रण लावावे.
१२. नंतर दुसरी पोळी त्याच्यावर ठेवावी आणि दुधानी कडा बंद कराव्यात.
१३. तयार पोळी तव्यावर  तूप लावून खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावी.
१४. अश्या प्रकारे सर्व पराठे करावेत.
१५. गरम- गरम परोठे तुपाबरोबर सर्व्ह करावे.  
Badam (Almond) -Khoya Paratha - बदाम - खवा पराठा Badam (Almond) -Khoya Paratha - बदाम - खवा पराठा Reviewed by Prajakta Patil on May 25, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.