Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप

भाज्यांचे सूप बनवायला सोपे आणि पटकन बनणारे असे आहे. सूप बनवताना लागणारे पदार्थ आपल्या किचन मध्ये सहज मिळतील. खास बाजारातून कोणताच पदार्थ आणावा लागत नाही.  ताज्या भाज्यांच्या सूप मधील वापर पौष्टिक आहे.


लागणारा वेळ : २०  मिनिटे
जणांसाठी : २ -३

साहित्य :
  • १ गाजर
  • २ -३ दुधी भोपळ्याचे तुकडे
  • कोबी
  • ४ -६ फरसबीच्या शेंगा
  • १ टोमाटो
  • फ्लॉवर
  • ७ - ८ आल्याचे लहान तुकडे
  • काळी मिरी 
  • मीठ
  • तूप 
 कृती :
१. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन, चिरून २ ते ३ कप पाण्यात शिजवून घ्याव्यात.
२. भाज्या शिजताना त्यात आल्याचा तुकडा व काळी मिरी घालावी.
३. आवश्यक वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे.
४. नंतर गाळणयंत्रावर सूप गाळून घेऊन त्यामध्ये थोडे मीठ व थोडे लोणी घालून पुन्हा एकदा उकळून घ्यावे.
५. उकळलेले सूप गरम - गरम सर्व्ह करावे.
Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप Reviewed by Prajakta Patil on April 18, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.