Tandulachya Pithache Dhirde - तांदुळाच्या पिठाचे धिरडे

बनवायला अतिशय सोपी, पौष्टिक आणि चवदार पाक-कृती म्हणजे धिरडे. चावायला मऊ आणि सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाल्ला जाणारा पदार्थ. तसेच उकडलेले गाजर, टोमाटो अश्या भाज्या घातल्या तर चव अजून छान लागते. घरी नक्की करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

लागणारा वेळ : २० मिनिटे
जणांसाठी  : ८ - १०

साहित्य :
  • २ कप तांदुळाचे पीठ
  • १ चमचा बारीक चिरलेली मिरची
  • १ चमचा बारीक केलेली कोथिंबीर 
  • १ चमचा किसलेले आले
  • ताक
  • मीठ
  • तूप 
कृती :
१. तूप वगळून सर्व पदार्थ चांगले एकत्र करावे. त्यात गुठळ्या होऊ देऊ नये. 
२. तव्यामध्ये तूप गरम करावे आणि त्यात वरील मिश्रण ओता. आणि चमच्याने जाडसर गोल करा. 
३. धिरडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत शिजवा. मधेच बाजूनी चमचाभर तूप सोडा. 
४.  धिरडे निट शिजले की उलटा आणि दुसरी बाजू निट शिजवून घ्या.
 ५. धिरडे झाले की gas बंद करून प्लेट मध्ये काढून घ्या. 
६. बाकीच्या मिश्रणाची वरील प्रकारे धिरडी घाला.
७. तयार गरम धिरडे tomato ketch - up बरोबर सर्व्ह करावे. 
Tandulachya Pithache Dhirde - तांदुळाच्या पिठाचे धिरडे Tandulachya Pithache Dhirde - तांदुळाच्या पिठाचे धिरडे Reviewed by Prajakta Patil on April 17, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.