Tandoori Roti in Oven - ओव्हन मधील तंदुरी रोटी

तंदुरी रोटी ही तंदूर शिवाय बनवता येत नाही ? असे वाटत असेल तर खालील कृती नक्की करून बघा. ओव्हन मध्ये बनवलेली तंदुरी रोटी. आणि गरम-गरम आवडत्या रश्याबरोबर वाढा.

लागणारा वेळ: १ - १/२ तास
जणांसाठी:

साहित्य:
  • २ कप गव्हाचे पीठ 
  • १/२ कप मैदा 
  • २ चमचे बेकिंग पावडर  
  • १/२ चमचा मीठ
  • १/४ चमचा साखर  
  • २ चमचे तेल 
  • १/२ कप दही 
  • पाणी (गरजेनुसार)
  • २ चमचे तूप  
  • १/२ कप दुध 
कृती :
 
१. प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे.
२. आता त्यामध्ये मीठ, दुध, दही आणि तेल घालून चांगले मळून घ्यावे.  
३. वरील मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या.
४. मळलेल्या पिठाला दमट कपडयाने साधारण १/२ तास झाकून ठेवावे.
५. साधारण ५०० degrees वर बेकिंग ट्रे गरम करून घ्या. 
६. नंतर ओव्हन उच्च broil कडे वळवावे. 
७. मळलेल्या पीठाचे समान गोळे करावेत.  
८. पोळपाटावर थोडे सुके पीठ भुरभुरावे. आणि हलक्या हाताने जाडसर रोटी लाटावी.
९. लाटताना रोटी चिकटत असेल तर सुक्या पिठाचा उपयोग करावा.
१०. तयार रोटीला दोन्ही बाजूने ३-४ थेंब पाणी पसरवावे. 
११. ही रोटी ओव्हन मध्ये ठेवावी. एका वेळेला आपण ओव्हन मध्ये २-३ रोट्या ठेऊ शकतो. 
१२. ओव्हन मध्ये रोटी दोन्ही बाजूने १ -२ मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत शेकवून घ्यावी.
१३. दोन्ही बाजूने खरपूस शेकलेली रोटी  बाहेर काढून त्यावर तूप लावावे. 
१४. बाकीच्या रोट्या अश्याच रीतीने कराव्यात. पण त्यापूर्वी ओव्हन २-३ मिनिटे reheat होऊ द्यावा. 
१५. माशाच्या किंवा मटणाच्या गरम रश्याबरोबर तंदुरी रोटी serve करावी.
Tandoori Roti in Oven - ओव्हन मधील तंदुरी रोटी Tandoori Roti in Oven - ओव्हन मधील तंदुरी रोटी Reviewed by Prajakta Patil on April 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.