Sabudana - Batata Gulabjamun - साबुदाणा-बटाटा गुलाबजाम

आपण नेहमी उपासाला साबुदाणा खिचडी, वडे असे बनवतो. किंवा फळे खातो. पण आता साबुदाणे आणि बटाटे वापरून आपण नेहमी करतो तसे गुलाब जाम करू शकतो. हे चवदार, खरपूस तळलेले आणि साखरेच्या पाकात टाकून मुरलेले रसदार उपासाचे गुलाब जाम नक्की करून बघा. खाली उपवास स्पेशल साबुदाणा-बटाटा गुलाब जाम कृती देत आहे. 


लागणारा वेळ: २०-३० मिनिटे
जणांसाठी: ५-६

साहित्य :
  • पाव वाटी साबुदाणा पीठ 
  • १ वाटी खवा 
  • १ लहान उकडलेला बटाटा
  • ३ वाट्या साखर 
  • वेलदोड्यांची पूड
कृती :
१. साबुदाण्याचे पीठ करताना साबुदाणे आधी भाजून घ्यावे आणि नंतर पीठ करावे.
२. बटाटे किसणीवर किसून घ्यावे.
३. खव्यामध्ये किसलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ घालून चांगले एकजीव होईपर्यंत मळावे किंवा   मिक्सरमधून काढावे नंतर  त्याचे छोटे- छोटे गोळे करावे.
४. एका भांड्यात १ कप पाणी, ३ कप साखर आणि वेलदोड्यांची पूड घालून उकळी आणावी. 

५. हे मिश्रण साधारण मिनिटभर उकळवून gas बंद करावा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप ढवळत रहावे. 
६. तयार साखरेचा पाक बाजूला ठेऊन द्यावा.
७. कढईत तूप किंवा तेल गरम करण्यास ठेवावे.
७. तूप गरम होताच gas बारीक करून त्यात तयार केलेले गुलाब जाम सोडून हलक्या हाताने ६-७ मिनिटे तळावेत.

८. मध्ये मध्ये हलवत रहा म्हणजे गुलाब जाम सर्व बाजूनी निट तळले जातील. 
९. गुलाब जामना सोनेरी रंग आला कि बाहेर काढून थोडे थंड होऊ द्यावेत आणि मगच साखरेच्या पाकात टाकावेत. 
१०. साधारण २० मिनिटे गुलाब जाम पाकात बुडवून ठेवावेत. 
११. तयार साबुदाणा-बटाटा गुलाबजाम उपवासाला खाता येतात.
Sabudana - Batata Gulabjamun - साबुदाणा-बटाटा गुलाबजाम Sabudana - Batata Gulabjamun - साबुदाणा-बटाटा गुलाबजाम Reviewed by Prajakta Patil on April 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.