Methi Khakra - मेथी खाकरा

माझ्या नंदेने खास गुजरात वरून माझ्यासाठी खाकरा आणला होता. आणि कुरकुरीत, थोडासा मसालेदार पण साधा खाकरा खायचा योग पहिल्यांदा तेव्हा आला. त्या खाकऱ्यात दुसरे काही मिक्स केले नव्हते. आणि मला तो इतका आवडला कि मी घरी करून बघायचे ठरवले. झाले ! साहित्य आणून खाकरा बनवला पण तो कडक न होता मऊ झाला. मग मी ऑन-लाईन माहिती गोळा करून परत एकदा प्रयत्न केला आणि आश्चर्य ! तयार खाकरा एकदम भारी झाला. मग मी त्यात मेथी, मसाला  वापरून केले. तेही छान झाले. खाली मेथी खाकरा बनवण्याची कृती देत आहे. घरी बनवा आणि enjoy करा.
 
लागणारा वेळ: ३० मिनिटे
जणांसाठी: ८-१०

साहित्य :
  • १ मेथीची गड्डी 
  • २ वाट्या कणिक
  • १ चमचा जिरे पावडर
  • तिखट
  • हळद
  • हिंग
  • मीठ
  • तेल
कृती :
१. मेथीचे पाने - पानेच निवडावीत म्हणजे कडूपणा येणार नाही.
२. पाने स्वच्छ धुऊन ती बारीक चिरावीत.
३. कढईत तेल टाकून मेथी वाफवून घ्यावी.
४. वाफवतानाच त्यात तिखट, मीठ, हिंग हळद, जिरेपूड, टाकावी.
५. ह्या मिश्रणात कणिक घालून घट्ट पीठ भिजवावे व त्याच्या पातळ पुऱ्या लाटाव्यात.
६. प्रत्येक पुरीला सुरीने अलगदपणे चिरा द्याव्यात म्हणजे तळताना पुरी फुगत नाही व गार झाल्यावर कडक राहून खुटखुटीत राहते. 
७. हे मेथीचे खाकरे चहा बरोबर चांगले लागतात. 
Methi Khakra - मेथी खाकरा Methi Khakra - मेथी खाकरा Reviewed by Prajakta Patil on April 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.