Thandaai - थंडाई

होळीसाठी खास बदाम, पिस्ता, herbs आणि मसाले टाकून बनवलेले थंड पेय म्हणजे थंडाई. होळी किंवा महाशिवरात्रीला पुष्कळ लोक भांग टाकून थंडाईचा आनंद घेतात. होळी अगदी जवळ आली असल्याने healthful आणि ताजेतवाने करणारे पेय थंडाईची सोपी कृती खाली देत आहे. एकदा तरी  नक्की करून बघा.
लागणारा वेळ: १-२ तास (रात्रभर भिजवण्यासाठीचा वेळ वगळून)
जणांसाठी: ६-७
साहित्य :
 • २ मोठे चमचे बदाम
 • २ मोठे चमचे पिस्ता
 • २ मोठे चमचे काजू
 • २ मोठे चमचे खसखस
 • १/२ चमचा बडीशेप
 • ७-८ वेलदोडे
 • ३० ग्रॅम मीठ
 • मिरे
 • १ चमचा खरबूज किंवा टरबूजच्या बिया
 • १ चमचा काकडीच्या बिया
 • १ चमचा जायफळपूड
 • ५ कप दुध
 • २-३ कप पाणी
 • १ कप साखर
 • १ कप fresh cream
 • २ चमचे गुलाबाच्या पाकळ्या
 कृती :
१. बदाम, पिस्ता, काजू, गुलाबाच्या पाकळ्या,खसखस,काकडीच्या आणि टरबूजच्या बिया, बडीशेप रात्रभर पुरेश्या पाण्यात  भिजत घालावे.
२. सकाळी त्यात मिरे व जायफळपूड घालूनमिक्सर मधून वाटून घ्यावे.
३. बारीक दात्याच्या चालणीखाली एक मोठे भांडे ठेवावे. वरील वाटलेले मिश्रण चाळणीत थोडे-थोडे ओतून वरून थोडे-थोडे पाणी घालून हाताने दाब द्यावा म्हणजे सगळा रस भांड्यात जमा होईल.
४. वरील कृती चालणीतील मिश्रण सुखे होईपर्यंत करत रहावी.   
५. आता त्यामध्ये साखर आणि fresh cream घालून एकजीव करावे.
६. आता त्यात दुध घालून नीट मिक्स करून घ्या.
७. तयार थंडाई वर कापलेले बदामाचे,काजूचे आणि पिस्त्याचे तुकडे व थोड्या केशराच्या काड्या
पसरावा.
८. साधारण तासभर थंडाई फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा आणि खायला द्या. 
Thandaai - थंडाई Thandaai - थंडाई Reviewed by Prajakta Patil on March 15, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.