Masoor Dal Rolls - मसूर डाळीचे रोल्स

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी :६ - ८  


साहित्य :  
 • १ वाटी मसुराची डाळ 
 • १/२ वाटी तांदूळ 
 • २ चमचे घट्ट डालडा 
 • २ कप दुध 
 • १/२ चमचे मोहरी पूड 
 • १ अंड्यातील पिवळे 
 • ५० ग्रॅम किसलेला चीझ 
 • ४० ग्रॅम मैदा 
 • १ बारीक चिरलेला कांदा 
 • मिरपूड 
 • मीठ 
 • १ चमचा parsley, बारीक चिरलेली
कृती :

१. डाळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये उकळलेले पाणी ओतून दोन तास भिजत ठेवावी.
२. ती डाळ शिजवून घ्यावी व चाळणीवर ओतून निथळून घेवून मिक्सर मध्ये वाटून घ्यावी.
3. तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
४. वाटलेली डाळ, तयार भात, मीठ व किसलेले चीज एकत्र करून नीट मळून घ्यावे आणि बाजूला ठेवून द्या.
५. डालडा गरम करून त्यात मैदा घालून थोडा भाजून घ्या आणि त्यात मोहरीपूड व दुध घालून घट्ट मिश्रण करा.
६. त्यात बारीक चिरलेला कांदा, parsley , अंड्यातील पिवळे, मिरपूड व मीठ घालून चांगले एकत्र करून घ्या.
७. नंतर त्यामध्ये डाळीचे मिश्रण घालून थंड होऊ दयावे.
८. थोड्या कोरड्या मैदयामध्ये मीठ व मिरपूड घाला.
९. हाताला थोडा कोरडाच मैदा घेऊन वरील मिश्रणाचे मोठे बॉल्स करून मीठ व मिरपूड घातलेल्या मैदयामध्ये घोळ्वावेत.
१०. मग अनुक्रमे अंड्यात आणि ब्रेडकम्समध्ये घोळवून दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत.
११. गरम- गरम रोल्स tomato ketch-up बरोबर सर्व्ह करावेत.
Masoor Dal Rolls - मसूर डाळीचे रोल्स Masoor Dal Rolls - मसूर डाळीचे रोल्स Reviewed by Prajakta Patil on March 12, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.