Puran Poli - पुरण पोळी

एक पारंपारिक पदार्थ, होळीमध्ये हमखास बनणारा. पुरण पोळी बनवण्याची पण एक कला असते. हि पोळी अत्यंत हलक्या हाताने लाटावी लागते. लाटताना त्यातील पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पुरण पोळी बनवण्याची सोपी कृती खाली देत आहे. होळी ला नक्की  बनवा. 
लागणारा वेळ: ६० मिनिटे 

साहित्य :
 • १ किलो हरभऱ्याची डाळ
 • १/२ किलो पिवळा गुळ, किसलेला 
 • १/२ किलो साखर
 • वेलची पूड
 • थोडेसे केशर
 • १/४ जायफळची पूड
 • १ फुलपात्र रवा
 • १ फुलपात्र कणिक
 • २ फुलपात्र मैदा
 • १ वाटी तेल
 • मीठ 
कृती :
१. हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन शिजत घालावी. शिजताना त्यात थोडे तेल व हळद घालावी.
२. डाळ चांगली शिजली की ती एका चाळणीत काढून घ्यावी.
३. सर्व पाणी निथळले की त्यात चिरलेला गुळ व साखर घालून पुरण घट्ट शिजवावे.
४. नंतर त्यात १/४ चमचा मीठ, जायफळ,वेलची पूड व केशर घालून पुरणयंत्रावर किंवा पाट्यावर पुरण  वाटावे.
५. एका परातीत रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून रवा भिजत ठेवावा.
६. त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवून थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली मळून घ्यावी.
७. पुरणपोळीची कणीक नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा सैलच असावी.
८. कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळ्या लाटाव्यात.
९. पोळी तव्यावर टाकताना लाट्ण्यावर गुंडाळून टाकावी किंवा कागदाच्या जाड घडीवर काढून घ्यावी व तव्यावर टाकावी.
१०. पुरणपोळी दोन्ही बाजूने सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजावी.
११. गरम-गरम पुरण पोळीवर तूप सोडून किंवा दुधात बुडवून खा.
Puran Poli - पुरण पोळी Puran Poli - पुरण पोळी Reviewed by Prajakta Patil on March 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.