Pani Puri - पाणी पुरी

मुंबईतील सर्वात लोकप्रिय डिश.  आपण सर्वांनी एकदातरी रस्त्यावरील पाणी-पुरी खाल्ली असेलच. तशीच मी पण अधून-मधून खात होते. एकदा विचार आला, रस्त्यावरील काहीशी unhygienic पाणी पुरी खाण्यापेक्ष्या घरी केलेली काय वाईट?  मग सर्व साहित्य आणले आणि मस्त चटकदार पाणी पुरी करून सगळ्यांना जेवणा ऐवजी पोटभर खायला दिली. सगळेच खुश आणि चवीत बदल म्हणून मुलेही खुश ! double maja ! घरी केलेल्या पाणी-पुरीची साधी कृती खाली देत आहे. आपले अभिप्राय द्यायला विसरू नका.
लागणारा वेळ:  १ तास
जणांसाठी: ४-५

साहित्य :
 • २ मोठ्या वाट्या बारीक रवा
 • १/२ चमचा मीठ 
 • १ चमचा तुपाचे मोहन 
पाणीपुरीचे पाणी 

साहित्य :
 • ६ ते ७ कप पाणी 
 • थोडासा पुदिना 
 • लिंबाएवढी चिंच 
 • २-३ हिरव्या मिरच्या 
 • लहानसा आल्याचा तुकडा 
 • १ चमचा जिरे 
 • २-३ लवंगा 
 • १/४ चमचा  मिरपूड 
 • लाल तिखट 
 • गुळ 
 • १/२ चमचा लिंब 
 • मीठ (चवीनुसार)
 • १ वाटी मोड आलेले मुग 
 • २-३ उकडलेले बटाटे 
पुरीची कृती :
१. मीठ व तूप आणि लागेल तसे पाणी घालून रवा भिजवावा. नेहमी पुरीसाठी मळतो तसे पीठ मळावे.
२. मळलेले पीठ ओल्या कपड्याखाली ३० मिनिटे झाकून ठेवावे.
३.  खूप मळून घ्यावे आणि थोड्या रव्यावरच मोठी पोळी लाटून डबीच्या झाकणाने लहान लहान पुरया
  कापाव्यात व जशा जशा होतील तशाच लगेच तळत जाव्यात.             
३. कढईत तेल घेऊन तेलाला उकळी आली की कढई खाली उतरवून त्यात एक एक पुरी सोडावी.
४. झाऱ्याने कड दाबावी म्हणजे पुरी लगेच फुगते.पुऱ्या फुगल्या कि कढई पुन्हा gas वर ठेवावी.
५. नंतर पुऱ्या उलटून मंद gas वर चांगल्या कडक होईपर्यंत तळाव्यात असे प्रत्येक वेळी करावे.
पाणी पुरीच्या पाण्याची कृती :
१. १ वाटी मोड आलेले मुग आणि बटाटे थोडी हळद घालून वाफवून घ्यावेत.
२. चिंचेचा कोळ तयार करून घ्यावा.
३. मिरच्या, आले, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी वाटून घ्यावी.
४. नंतर वाटलेली चटणी, चिंचेचा कोळ व गुळ एकत्र करावे.
५. ह्या पाण्यात थोडा लिंबाचा रस घालावा म्हणजे चव फार सुंदर लागते.
६ प्रत्येक पुरी वरच्या बाजुने थोडी फोडून त्यात मुग व थोडा बटाट्याचा चुरा भरून वरील पाण्यात बुडवून
  प्लेट्स तयार करून लगेच खाव्यात.
७.प्रत्येकाला एका वाटीत थोडेसे तयार पाणी व मुग घातलेल्या पुऱ्या द्याव्यात.

टीप:
जर पुरया करण्यासाठी वेळ नसेल तर बाजारात तयार पुऱ्यांची पाकिटे मिळतात. ती आणून ठेवावी म्हणजे पाणी पुरी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 

Pani Puri - पाणी पुरी Pani Puri - पाणी पुरी Reviewed by Prajakta Patil on March 06, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.