Malpua - मालपोहा

मालपोहा  साधारणता होळी मध्ये बनवतात. मालपोहा हा बनवायला अतिशय कठीण असा काही लोक विचार करतात. पण ही कृती वाचून मालपोहा किती सोपा आहे हे लक्ष्यात येईल. आणि तुम्ही प्रत्येक सणाला मोलपोहा बनवाल. इतकेच नाही तर केळे, अननस किंवा आंबे वापरून पण मालपोहा बनवता येऊ शकतो.

लागणारा वेळ: ४० - ४५ मिनिटे
जणांसाठी: २ - ३

साहित्य : 
  • १ लिटर दुध
  • १/२ कप मावा
  • १/२ कप मैदा
  • २ कप साखर
  • केशर
  • १/२  चमचा वेलची पावडर
  • तूप
  • पिस्ते
कृती:
१. जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. असल्येल्या दुधाच्या प्रमाणापेक्ष्या १/३ होईपर्यंत दुध आटवून घ्या.
२. आटवलेल्या दुधात मावा मिसळून नीट मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. तयार मिश्रण थंड होऊ द्या.
३.एका भांड्यात जितकी साखर असेल तितकेच पाणी घालून उकळवत ठेवा. थोड्याश्या दुधात केशराच्या काड्या घोळवून ते साखरेच्या मिश्रणात ओता.
४. वरील साखरेचे मिश्रण ८-१० मिनिटे उकळवा म्हणजे साखरेचा एकतारी पाक तयार होईल. थोडी वेलची पावडर घाला. साखरेचा पाक तयार झाला.
५. आता मैदा, वेलची पावडर आणि २ चमचे साखर माव्याच्या मिश्रणात घालून नीट एकजीव करा.
६. तयार माव्याचे मिश्रण कढईमध्ये ओतता आले पाहिजे जर तसे नसेल तर थोडे दुध घालून पातळ करून घ्या.
७. एका रुंद तोंडाच्या आणि खूप खोल नसलेल्या कढईत तूप गरम करत ठेवा.
८. एक मोठा चमचाभर माव्याचे मिश्रण ह्या कढईत गोल आकारात ओता. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
९. एका बाजूने तळून झाले की उलटवा आणि दुसऱ्या बाजूने पण नीट तळून घ्या.
१०. दोन्ही बाजूने नीट तळून झाला कि कढईतून काढून तयार साखरेच्या पाकात टाका.
११. मालपुवा खायला तयार ! पिस्त्याचे काप करून सजवा.
Malpua - मालपोहा Malpua -  मालपोहा Reviewed by Prajakta Patil on March 18, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.