Kolambi Pattice - कोलंबीचे पॅटीस

तोंडाला पाणी सुटेल अशी डिश. एकदम आवडीचे, चटपटीत starter. बनवण्यास एकदम सोपे, खूप चविष्ठ असे हे patties फक्त एकच खाणे अशक्य. आपल्या कुटुंबाला एक वेगळीच treat द्या.

लागणारा वेळ: ३०-४० मिनिटे
जणांसाठी:  ५-६

साहित्य :
 • १ वाटी साफ केलेली कोलंबी 
 • २ मध्यम कांदे 
 • १ वाटी ओले खोबरे 
 • १ कोथिंबीरीची जुडी 
 • २ टोमाटो 
 • १ चमचा धनेपूड 
 • तिखट 
 • मीठ 
 • हळद 
 • तेल 
कव्हर :
 • १/२ किलो बटाटे 
 • थोडे तिखट 
 • मीठ 
 • मिरपूड 
कृती :
१. कोलंबी स्वच्छ धुऊन बारीक चिरावी आणि तिला हळद व मीठ लावावे.
२. थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा बदामी रंगाचा झाला कि त्यात धनेपूड टाकून जरा परतावे.
३. एक पाण्याचा हबका द्यावा म्हणजे खमंग वास येईल.
४. त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालून जरा परतून चिरलेली कोलंबी घालावी.
५. नंतर त्यावर झाकण ठेवून कोलंबी चांगली शिजू द्यावी. कोलंबी शिजली कि पाणी आटवून घ्यावे.
६. त्यात तिखट, मीठ, ओले खोबरे घालावे.
७. भाजी कोरडी झाली कि खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.
८. बटाटे उकडून घ्यावेत व गरम असतानाच मळावेत.
९. त्यात थोडे तिखट, मीठ, मिरपूड व १ चमचा कॉर्नफ्लोअर घालावे.
१०. त्याचे बेताच्या आकाराचे गोळे करून पारया करून त्यात सारण भरून पॅटीस करावे.
११. नंतर रव्यात घोळवून उथळ तव्यावर थोडे तेल घालून तळावेत.

टीप:
जर जेवणातली उरलेली माशाची भाजी असेल तर कोलंबीऐवजी ती वापरू शकता. 
Kolambi Pattice - कोलंबीचे पॅटीस Kolambi Pattice - कोलंबीचे पॅटीस Reviewed by Prajakta Patil on March 06, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.