Jeera Biscuit - जिरा बिस्किटे

खूप पूर्वी आम्ही बेकरीमधून जिरा बिस्किट्स आणायचो. बिस्किट्सची गोड चव आणि  दाताखाली येणारे जिऱ्याचे कण खूप छान लागतात. बिस्किट्स करण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि झटपट होणारी कृती म्हणून जिरा बिस्किट्स माझे favorite आहेत. खालील कृती वाचून जिरा बिस्किट्स बनवा आणि वाफाळत्या चहाबरोबर खायला द्या.
Read Jeera Biscuits In English

साहित्य :
  • २ कप मैदा 
  • १२५ ग्रॅम लोणी 
  • १२५ ग्रॅम चीझ 
  • १ अंड्यातले पिवळे 
  • १ चमचा पाणी 
  • १ चमचा रगडलेले जिरे 
  • १ अंड्यातले पांढरे 
  • मिरपूड 
  • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. मैदा, मीठ व मिरपूड एकत्र करून चाळून घ्यावे.
२. सुरीने लोणी व चीझ बारीक कापून मैद्यामध्ये मिसळून चांगले चोळावे व लगेच जिरे घालावे.
३. अंड्यातील पिवळे व पाणी एकत्र करून पीठ भिजवावे व गोळा चांगला मळून घ्यावा.
४. प्ल्यास्तिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवावा.
५. नंतर त्याची पोळी लाटून गोल आकाराची बिस्किटे कापावीत.
६. प्रत्येक बिस्कीटाला अंड्यातील पांढऱ्या बलकाचा थोडा हात फिरवावा म्हणजे बिस्किट किंचित ब्राऊन
    रंगाचे दिसते व त्याला एक छान चमक येते.
७. थाळीला तुपाचा हात फिरवून ३७५ F किंवा १९० C ह्या टेंपरेचरवर ठेवून १० मिनिटे बेक करावीत.
Jeera Biscuit - जिरा बिस्किटे Jeera Biscuit - जिरा बिस्किटे Reviewed by Prajakta Patil on March 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.