Coconut Cream Cake - नारळाचा क्रीम केक


लागणारा वेळ : ४०-४५ मिनिटे

साहित्य :
  • १ १/२ कप मैदा
  • १/२ कप लोणी
  • ३/८ कप पिठीसाखर
  • ६० ग्रॅम सुक्या खोबरयाचा कीस
  • २ अंडी
  • १ चमचा दुध  
आयसिंगसाठी :
  • १ १/४ कप आयसिंग शुगर
  • १ चमचा क्रीम
  • ६० ग्रॅम खोबरे कीस
  • १ अंड्यातील पांढरे 
कृती :
१. नेहमीप्रमाणे लोणी फेटून घेवून त्यात पिठीसाखर घालून पुन्हा फेटावे.
२. अंडी फोडून त्यात घालून खूप फेसून घ्यावीत, मिश्रण हलके व्हायला पाहिजे. 
३. त्यात थोडा थोडा मैदा घालून मिश्रण तयार करावे.
३. तयार मिश्रणात खोबरे कीस व दुध घालून पुन्हा फेटावे.
४. केकच्या लहान लहान साच्यांना तुपाचा हात फिरवून साच्याच्या ३/४ भागापर्यंत वरील पीठ घालावे.
५. नंतर २० ते २५ मिनिटे ओव्हन मध्ये भाजून घ्यावेत.
६. थंडगार झाल्यानंतर त्यावर आयसिंग करावे.  

कोकोनट क्रीम :
१. आयसिंग शुगर चाळून  घेवून नंतर त्यात क्रीम, खोबरेकीस व अंड्यातले पांढरे घालून खूप फेटून घ्यावे.
२. हे मिश्रण थोडे सुकू देवून नंतर वरील केकला ह्या मिश्रणाचे आयसिंग करावे.
३. खोबऱ्याचा सुका किस ओव्हन मध्ये ८-१० मिनिटे ३२५ D ला बेक करून घ्या. हा कुरकुरीत कीस केक वर पसरावा. 
Coconut Cream Cake - नारळाचा क्रीम केक Coconut Cream Cake - नारळाचा क्रीम केक Reviewed by Prajakta Patil on March 03, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.