Bhang Pakora - भांग पकोडे

भांग पकोडा हा अतिशय सोपा पण तितकाच टेस्टी पदार्थ होळीमध्ये हमखास खाल्ला जातो. कुरकुरीत, चटपटीत असा हा पकोडा होळीसाठी अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भांग लाडू, भांग सरबत आणि थंडाई हे पदार्थ होळीच्या १००% असणारे आणि आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.


लागणारा वेळ : ३५ मिनिटे
जणांसाठी : ३ - ४

साहित्य :
 • १०० ग्रॅम  फ़्लॉवर
 • १०० ग्रॅम बटाटे
 • १०० ग्रॅम कांदे
 • १०० ग्रॅम पालक
 • १०० ग्रॅम वांगी
 • २०० ग्रॅम बेसन
 •  ५ ग्रॅम ओवा
 • १० ग्रॅम भांगेच्या बियांची पावडर (cannabis)
 • मीठ (गरजेनुसार)
 • तेल
 • २ ग्रॅम soda bicarb
 • २ ग्रॅम डाळींबाच्या बियांची पावडर
कृती :
१. सर्व भाज्या स्वच्छ धुवून त्याचे छोटे - छोटे तुकडे करावे.
२. soda-bacarb, मीठ, बेसन  एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे.
३. त्यामध्ये भांग पावडर, ओवा, डाळींबाच्या बियांची पावडर आणि मिरची पावडर एकत्र करावे.
४. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण जाडसर करावे. 
५. एका कढईत तेल गरम करत ठेवावे. 
६. सर्व भाज्या बेसनच्या मिश्रणात बुडवून मंद gas वर सोनेरी  रंगाचे होईपर्यंत तळावेत. 
७. तयार झालेले गरम-गरम भांग पकोडे हिरवी चटणी किंवा tomato ketch-up बरोबर सर्व्ह करा.  
Bhang Pakora - भांग पकोडे Bhang Pakora - भांग पकोडे Reviewed by Prajakta Patil on March 15, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.