Strawberry Cup Cake - स्ट्रोबेरी कप केक

Valentines day साठी परफेक्ट केक. स्ट्रोबेरी कप केक आणि icing ची सोपी कृती वाचकांना देत आहे. नक्की करून बघा आणि आपले अभिप्राय कळवा.

जणांसाठी:  १२ केक 

साहित्य:
कप-केक साठी:
 • १ १/२ कप मैदा 
 • १ चमचा बेकिंग पावडर 
 • १/२ चमचा मीठ 
 • २/३ कप ताज्या स्ट्रोबेरी 
 • १/४ कप दुध
 • १ अंड 
 • २ अंड्यातील पांढरे 
 • १ चमचा vanilla extract 
 • १ कप साखर 
Frosting साठी:
 • १/२ कप ताज्या स्ट्रोबेरी 
 • मीठ, चिमुटभर 
 • ३ १/२ कप साखर 
 • १/२ चमचा vanilla 
 • १ कप बटर 
कृती:
कप केक:
१. Food Processor मध्ये स्ट्रोबेरीची प्युरी करून घ्यावी. त्यामध्ये दुध आणि vanilla add करा.
२. मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एका बाउल मध्ये एकत्र करून बाजूला ठेऊन द्या.
३. दुसऱ्या बाउल मध्ये बटर फेटून घ्या. त्यात साखर, अंडे, आणि अंड्याचे पांढरे मिक्स करून एकजीव करा.
४. ह्या मिश्रणात प्रथम थोडे मैद्याचे मिश्रण आणि थोडी स्ट्रोबेरीची प्युरी add करा. दोन्ही मिश्रण संपेपर्यंत add करत राहा. Add करताना पहिले सुखे मिश्रण आणि नंतर ओले मिश्रण add करा.
५. कप केकच्या १२ साच्यांना तुपाचा हात लावून घ्या. ओव्हन ३५० D ला preheat करून घ्या.
६. केकचे तयार मिश्रण १२ साच्यांमध्ये ओता आणि १५-२० मिनिटे बेक करा. केक ओव्हन मधून बाहेर काढायच्या आधी टूथपिक केकच्या मध्यभागी टोचून बघा, जर clean बाहेर आली तर केक झाला असे समजावे.
७. Frosting करायच्या आधी केक पूर्णपणे थंड होऊ द्यावा.

Frosting:

१. बटर चांगले फेटून घ्या.
२. त्यात मीठ, vanilla, साखर आणि स्ट्रोबेरीची प्युरी मिक्स करा. हलके आणि फुगीर होईपर्यंत फेटून घ्या.
३. प्रत्येक कप केक वर तयार frosting ओता.
Strawberry Cup Cake - स्ट्रोबेरी कप केक Strawberry Cup Cake - स्ट्रोबेरी कप केक Reviewed by Prajakta Patil on February 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.