Raw Mango Curry - कैरीची आमटी

कैऱ्यांचा मोसम चालू होत आहे.  कैरीला तिखट, मीठ लावून खाताना कसे वाटते? मस्त ना !  मग आता कैरीची हि आंबट-गोड आमटी एकदा करून बघा. नाव एकताच तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीच्या आमटीची कृती खाली देत आहे. नक्की करून बघा.

लागणारा वेळ: १५ मिनिटे
जणांसाठी: ४-५ 
 साहित्य:
 • 2 कैऱ्या, बारीक फोडी करून
 • नारळाची अर्धी वाटी  
 • २ चमचे उडीद डाळ 
 • २ चमचे तांदूळ 
 • १/२ चमचा मोहरी
 • १/२ चमचा मेथीदाणे  
 • १/२ चमचा हळद 
 • १/२ चमचा धने 
 • २-४ सुक्या लाल मिरच्या 
 • तेल 
 • गूळ  
 • मीठ  
 • कढीपत्ता  
कृती:

१. नारळाची वाटी खवून घ्यावी.
२. कढईत थोडे तेल घेऊन प्रथम उडीद डाळ आणि नंतर तांदूळ भाजून घ्यावेत.
३. आता त्याच कढईत मेथीदाणे, धने आणि मिरच्या भाजून घ्याव्यात. आता ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये खवलेला नारळ घालावा. त्यावर थोडी हळद घालावी.  ५-७ मिनिटे चांगले परतून घ्यावे.
४. त्यातील थोडा नारळ मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याचा रस काढावा.
५. उरलेला नारळ आणि वाटलेल्या नारळाचा चोथा परत बारीक वाटून घ्यावे.
६. एका पातेल्यात तेल गरम करत ठेवावे. त्यात हिंग, मोहरीची फोडणी करावी. कढीपत्ता टाकावा.
७. त्यात कैरीच्या फोडी टाकून परतून घ्याव्यात. मग त्यात नारळाचा रस घालावा.
८. नारळाचे वाटण घालून आवडीनुसार आमटी घट्ट किंवा पातळ करावी.
९. नेहमीप्रमाणे थोडा गूळ आणि मीठ घालावे.
१०. आमटीला उकळी येऊ द्यावी. गरम -गरम भाताबरोबर वाढावी.
Raw Mango Curry - कैरीची आमटी Raw Mango Curry - कैरीची आमटी Reviewed by Prajakta Patil on February 24, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.