आजची सकाळ माझी एकदम मस्त गेली. कारण? आज मी मस्तपैकी रव्याचा नारळ आणि गुळ घालून गोड शिरा केला. सकाळी सकाळी सगळ्यांनी हा गोड शिरा बघून आणि अर्थात खाऊन काय स्तुती केली माझी ! तुम्हाला पण आवडेल ना कोणीतरी स्तुती केलेली ? पण हा शिरा केल्याशिवाय स्तुती नाही मिळणार. म्हणून खाली दिलेली सोपी आणि झटपट होणारी कृती वाचून शिरा बनवा आणि स्तुती मिळवा. आपले अभिप्राय द्यायला विसरू नका.
लागणारा वेळ : १५ - २० मिनिटे
जणांसाठी : ५ - ६
साहित्य :
१. प्रथम रवा तुपावर तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यावा.
२. आता ह्या रव्यात गुळ घालून तो विरघळेपर्यंत हलवत राहावे.
३. गुळ विरघळला की त्यामध्ये पाणी आणि दुध टाकावे.
४. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यावी.
५. वाफ आल्यावर त्यामध्ये किसलेला नारळ घालून परत एक वाफ येऊन द्यावी.
६. नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकून खाली उतरावे.
७. गरम-गरम खायला द्यावे.
लागणारा वेळ : १५ - २० मिनिटे
जणांसाठी : ५ - ६
साहित्य :
- १ १/२ वाटी रवा
- १ १/२ वाटी गुळ
- १ वाटी किसलेला नारळ
- १ वाटी पाणी
- १ वाटी दुध
- १ वाटी तूप
- १ चमचा वेलची पावडर
१. प्रथम रवा तुपावर तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यावा.
२. आता ह्या रव्यात गुळ घालून तो विरघळेपर्यंत हलवत राहावे.
३. गुळ विरघळला की त्यामध्ये पाणी आणि दुध टाकावे.
४. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यावी.
५. वाफ आल्यावर त्यामध्ये किसलेला नारळ घालून परत एक वाफ येऊन द्यावी.
६. नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकून खाली उतरावे.
७. गरम-गरम खायला द्यावे.
Rava ani Naralacha Shira
Reviewed by Prajakta Patil
on
February 23, 2013
Rating:

No comments:
Post a Comment