Palak-Paneer Raita - पालक, पनीर रायता

पालक आणि पनीर वापरून केलेला पौष्टीक पालक पनीर रायता. सध्याच्या गरमी मध्ये थंडगार दही आणि पालक आपल्या शरीरासाठी कधीही चांगलेच !  तोंडी लावायला काहीतरी वेगळे असे आपल्या पानात असावे असे वाटत असेल तर हा रायता नक्की करून बघा.

लागणारा वेळ: १५ मिनिटे
जणांसाठी: २-३ 

साहित्य:
  • १ पालक जुडी
  • १०० ग्रॅम पनीर
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ वाटी गोड दही
  • मीठ, चवीनुसार
  • १ चमचा तेल
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड
कृती:
१. पालक निवडून नीट धुऊन वाफवून घ्या.
२. पालक गार झाला कि पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.
३. वाटताना त्यात मिरच्या घाल्याव्यात.
४. पनीरचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करावेत.
५. एका भांड्यात गोड दही, वाटलेला पालक, मीठ, पनीरचे तुकडे घालून नीट ढवळून घ्यावे.
६. त्यात जिरेपूड घालावी आणि हलवून घ्यावे.
७. एका भांड्यात तेलाची फोडणी करावी. त्यात मोहरी आणि मेथीदाणे घालावेत.
८. हि फोडणी तयार रायत्यावर घालावी. वरून थोडे लाल तिखट भुरभुरावे.
९. Side-dish म्हणून भात, पोळी बरोबर खाता येते. 
Palak-Paneer Raita - पालक, पनीर रायता Palak-Paneer Raita - पालक, पनीर रायता Reviewed by Prajakta Patil on February 23, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.