Paatvadya - पाटवड्या

थोड्याफार अळूवड्यांसारख्या वाटणाऱ्या पाटवड्या चवीला सुरेख. बनवायला थोड्याश्या कठीण वाटत असल्या तरी एकदा करून बघायला हरकत नाही. आपल्या आजीच्या काळातील हा प्रकार आज ही लोक आवडीने करतात. न चुकता करून बघा पाटवड्या आणि आपल्या आजी-आजोबांना खायला देऊन शाबासकी मिळवा.

लागणारा वेळ: २०-२५ मिनिटे
जणांसाठी: ५-६

साहित्य :
  • १ कप बेसन
  • २ कप पाणी
  • १/४ कप सुके खोबरे, किसलेले
  • ३-४ लसूण पाकळ्या, बारीक  केलेल्या
  • १ चमचा खसखस
  • लाल तिखट
  • मीठ, चवीनुसार
  • ४ चमचे तेल
  • जिरे, मोहरी,कढीपत्ता
कृती :
१. प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या.
२.  एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यामध्ये जिरे ,मोहरी ,हळद ,खसखस आणि कढीपत्ता घालुन १-२ मिनिटे परतून घ्या.
३. नंतर आहे त्यातील अर्धे खोबरे वरील मसाल्यात घालून थोडेसे परतून घ्यावे. खोबरे जळणार नाही इकडे लक्ष असू द्या.
४. आता वरील मिश्रणात पाणी टाकून ते उकळी आणावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालावी.
५. gas बारीक करून त्यामध्ये बेसन टाकून सतत हलवत राहावे. म्हणजे बेसनात गुठळ्या होत नाहीत.
६. तयार मिश्रण जाडसर आणि सुके असावे, पातळ असू नये.
७. जर तयार मिश्रण पातळ झाल्यासारखे वाटत असेल तर त्यात आणखी बेसन घालावे. भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे.
८.बेसन शिजल्यानंतर २-३ चमचे तेल त्यामध्ये घालून चांगले एकजीव करावे.
९.एका ताटाला तेलाचा हात लावून त्यावर कोथिंबीर आणि सुके खोबरे पसरावे.
१०.त्यावरती तयार बेसनाचे मिश्रण पसरून चमच्याने ते बेसन नीट थापावे.
११. त्यावर परत थोडी कोथिंबीर आणि सुके खोबरे घालून  चौकोनी आकाराच्या वड्या कराव्यात.
Paatvadya - पाटवड्या Paatvadya - पाटवड्या Reviewed by Prajakta Patil on February 15, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.