Khavyachya Polya - खव्याच्या पोळ्या


गोड -गोड, खुसखुशीत, गरमा-गरम  खव्याची पोळी खायची आहे का?  चला तर मग आजच try करून बघू.

पोळीचे साहित्य :
  • तीन कप कणिक 
  • १/४ कप तेल 
  • मीठ अर्धा चमचा 
  • २ कप पाणी 
  • १/२ कप तांदूळाचे पीठ 
सारणाचे साहित्य :
  • २ कप खवा
  • २ कप पिठीसाखर 
  • १ चमचा जायफळ किंवा वेलदोडेपूड 
  • २ चमचे दुध
कृती :
१. खवा परतून मिक्सरमध्ये मऊसर वाटून घ्यावा.
२.पिठीसाखर व खव्यामध्ये दुध घालून त्याचा गोळा तयार करावा.
३. मीठ व मोहन घालून कणिक दीड तास भिजवून ठेवावी.
४. तयार कणकेतून प्रथम २ छोट्या लाट्या  काढाव्यात.
५. त्यातील एक लाटी पुरी ऎवढी लाटून त्यावर खव्याच्या तयार सारणाचा १ छोटा गोळा ठेवावा आणि त्यावर दुसऱ्या लाटलेली पोळी ठेवावी.
६. दोन्ही पोळ्यांच्या कडा नीट बंद कराव्यात.
७. पोळपाटावर पिठी भुरभुरवून नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
८. तव्यावर गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजावी.
९. अश्या प्रकारे  सर्व पोळ्या करून घ्याव्यात.
१०. गरम असताना तुपाची धार सोडून खायला द्यावा.
Khavyachya Polya - खव्याच्या पोळ्या Khavyachya Polya - खव्याच्या पोळ्या Reviewed by Prajakta Patil on February 17, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.