Khajur Chutney - खजूर चटणी

खजूर आणि चिंच असलेली ही आंबट-गोड चटणी बहुतेक सर्व प्रकारच्या चाट बरोबर मस्तच लागते. आयत्या वेळी करत बसण्यापेक्ष्या फ्रीज मध्ये महिनाभर टिकते आणि फ्रीजर मध्ये ५-६ महिने टिकते.


साहित्य :
६ खजुराच्या बिया
१ चमचा जिरे
१ लिंबाएवढी चिंच
२ लिंबाएवढा गुळ
थोडे तिखट आणि मीठ

कृती :
१ . खजूर आणि चिंच वेगवेगळी २ ते ३ तासांसाठी पाण्यात भिजत घालावी.
२. नंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व एकत्र करून बारीक चटणी वाटावी.
३. आयत्या वेळी एक कप किंवा कमी-जास्त पाणी घालून गरजेनुसार चटणी पातळ करून घ्यावी.
 
Khajur Chutney - खजूर चटणी Khajur Chutney - खजूर चटणी Reviewed by Prajakta Patil on February 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.