Ice Cream Sandwich - आईस क्रीम sandwich

आवडते फ्लेवर वापरून घराच्या घरी तयार केलेले ice cream sandwich चवीला अप्रतिम. वर्षाच्या कोणत्याही मोसमात याची मेजवानी तुम्ही घेऊ शकता. चला तर मग हे सोपे आणि चवदार sandwich करून बघू.


साहित्य :
  • १/२ कप unsalted लोणी
  • १ अंड
  • १/२ कप मैदा 
  • १/४ कप unsweetened कोको पावडर 
  • ४ कप आईस्क्रीम (आवडता फ्लेवर)
  • १/२ कप साखर 
  • १ चमचा vanilla extract
कृती :
१.ओव्हन ३५० D.F.वर preheat करून घ्या.
२.gas  वर बटर पातळ करून घ्या.
३.एका मोठ्या भांड्यात, वितळलेले बटर आणि साखर मऊ होईपर्यंत फेटून घ्या.
४. अंडी आणि vanilla extract मिसळून नीट मिक्स करा.
५. आता मैदा, मीठ आणि कोको पावडर टाकून एकजीव होईपर्यंत फेटून घ्या.
६. १० x १५ इंच बेकिंग ट्रे ला प्लास्टिक पेपर लावून त्यावर तयार मिश्रण नीट पसरवा.
७. १०-१५ मिनिटे बेक करून घ्या. केकच्या बाजू भांड्याच्या कडेने सुटायला लागल्या कि केक झाला असे समाजावे.
८. थंड झाला कि wire rack वर काढून ठेवा.
९. Ice Cream फ्रीझर मधून बाहेर काढून घ्या. बाहेर काढलेले ice -cream थोडेसे कडक असावे.
१०. थंड झालेला केक मधून कापून घ्या.
११. आता केकच्या एका भागावर बाहेर काढलेले ice-cream नीट पसरावा आणि दुसरा भागाने झाकून घ्या.
१२. तयार sandwich केक प्लास्टिक मध्ये घट्ट लपेटून ठेवा आणि फ्रीझर मध्ये ठेवा.
१३. सेट झाले कि फ्रीज मधून बाहेर काढून आवडत्या आकारामध्ये कपा.
१४. लगेच खायला द्या.
१५. जर प्लास्टिक  bag मध्ये लपेटून फ्रीज मध्ये ठेवले तर साधारण १ आठवडा टिकू शकते.
Ice Cream Sandwich - आईस क्रीम sandwich Ice Cream Sandwich - आईस क्रीम sandwich Reviewed by Prajakta Patil on February 17, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.