Pudina Chutney - पुदिना हिरवी चटणी

पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी घरोघरी माहीत आहे. ढोकळा, समोसा, वडा-पाव किंवा sandwich बरोबर ही चटणी आवर्जून खाल्ली जाते. पुदिन्यामुळे चटणीला एक प्रकारचा वेगळाच हिरवा रंग आणि वास येतो. फ्रीज मध्ये ही चटणी आठवडाभर राहते.
लागणारा वेळ: १० मिनिटे

साहित्य :
  • १ वाटी पुदिना
  • १ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
  • ५-६ हिरव्या मिरच्या 
  • १/२ चमचा साखर 
  • १ चमचा अनारदाणा
  • १०० ग्रॅम जाडी शेव
  • मीठ (चवीनुसार)
कृती :१. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून वाटून घ्यावे.
२. वाटताना त्यात थोडे पाणी घालावे.
३. आयत्या वेळी एक कप किंवा त्यापेक्षा कमी-जास्त पाणी घालून चटणी गरजेनुसार पातळ करून घ्यावी. 
Pudina Chutney - पुदिना हिरवी चटणी Pudina Chutney - पुदिना हिरवी चटणी Reviewed by Prajakta Patil on February 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.